India vs Engaland 4th Test Highlights | अश्विन-अक्षर फिरकी जोडीचा ‘पंच’, भारताचा इंग्लंडवर डाव आणि 25 धांवानी विजय, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात धडक

| Updated on: Mar 06, 2021 | 5:44 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड याच्यातील चौथ्या कसोटीतील आजचा तिसरा दिवस आहे.

India vs Engaland 4th Test Highlights |  अश्विन-अक्षर फिरकी जोडीचा 'पंच', भारताचा इंग्लंडवर डाव आणि 25 धांवानी विजय, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात धडक
टीम इंडियाने हा चौथा कसोटी सामना जिंकत 3-1 च्या फरकाने मालिका जिंकली आहे. त्यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत (india vs england 2021 4th) टीम इंडियाचा डाव आणि 25 धावांनी  विजय झाला आहे. अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने पुन्हा एकदा कमाल केली आहे. अक्षर आणि अश्विन या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडने पाचारण केलं आहे. इंग्लंडचा दुसरा डाव या फिरकी जोडीने अवघ्या 135 धावांवर गुंडाळला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये 135 सर्वबाद धावा केल्या. यामुळे इंडियाचा 25 धावा आणि डावाने विजय झाला आहे. टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे. (india vs england 2021 4th test day 3 live cricket score updates online in marathi at narendra modi cricket stadium ahmedabad)

Key Events

अक्षर-अश्विन फिरकीची कमाल

अक्षर पटेल आणि आर अश्विन या फिरकी जोडीने कमाल केली आहे. या दोघांनीच इंग्लंडला दुसऱ्या डावात ऑल आऊट केलं. या फिरकी जोडीने प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाच्या पहिल्या डावात 365 धावा

टीम इंडियाने पहिल्या डावात 365 धावा केल्या. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक 101 धावा केल्या. तर यावेळेसही वॉशिंग्टन सुंदर दुर्देवी ठरला. शेपटीच्या फलंदाजांनी चांगली साथ न दिल्याने सुंदर 96 धावांवर नाबाद राहिला. दरम्यान  इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 06 Mar 2021 04:33 PM (IST)

    ‘लोकल बॉय’ अक्षरने उंचावली ट्रॉफी

    लोकल बॉय अक्षर पटेलने ही टेस्ट ट्रॉफी उंचावली. अक्षर पटेलने या संपूर्ण कसोटी मालिकेत आपल्या बोलिंगने धमाकेदार कामगिरी केली.

  • 06 Mar 2021 04:27 PM (IST)

    अश्विन ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’

    इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणारा आर अश्विन मालिकावीर ठरला आहे. अश्विनने या मालिकेत चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत घरच्या मैदानात शतकी कामगिरी केली. तसेच संपूर्ण सीरिजमध्ये फिरकीने एकूण 32 विकेट्स घेतल्या. अश्विनने ‘मालिकावीर’ पुरस्कार जिंकण्याची कामगिरी केली आहे.

  • 06 Mar 2021 04:21 PM (IST)

    शतकवीर रिषभ पंत ठरला 'मॅन ऑफ द मॅच'

    चौथ्या कसोटीत खणखणीत  शतक लगावणारा टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज रिषभ पंत सामनावीर ठरला.  रिषभ पंतने बॅटिंगसह दमदार  विकेटकीपिंगही केली.

  • 06 Mar 2021 03:59 PM (IST)

    टीम इंडियाचा डाव आणि 25 धावांनी विजय

    टीम इंडियाने चौथ्या कसोटीत इंग्लंडवर एक डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 3-1 ने  ही कसोटी मालिका जिंकली आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपच्या अंतिम सामन्यातही धडक मारली आहे. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात अक्षर पटेल आणि  अश्विन या दोन्ही फिरकी जोडीने इंग्लंडचा काम तमाम केला. या दोघांनी प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या.

  • 06 Mar 2021 03:31 PM (IST)

    इंग्लंडला आठवा धक्का

    इंग्लंडला आठवा धक्का बसला आहे. अक्षर पटेलने डोमनिक बेसला आऊट केलं आहे. यासह  अक्षरने 5 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह अक्षरने या मालिकेत चौथ्यांदा 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

  • 06 Mar 2021 03:07 PM (IST)

    इंग्लंडला सातवा धक्का

    इंग्लंडने सातवी विकेट गमावली आहे. अजिंक्य रहाणेने भन्नाट कॅच घेत बेन फोक्सला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यासह टीम इंडिया विजयाच्या आणखी जवळ पोहचली आहे.

  • 06 Mar 2021 02:38 PM (IST)

    तिसऱ्या सत्राला सुरुवात

    तिसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने या सामन्यावर मजबूत पकड मिळाली आहे. या तिसऱ्या सत्रातच सामना निकाली निघण्याची शक्यता आहे.

  • 06 Mar 2021 02:15 PM (IST)

    चहापानापर्यंत इंग्लंडच्या 6 बाद 91 धावा, सामन्यावर टीम इंडियाची घट्ट पकड

    दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. टीम इंडियाच्या फिरकीसमोर  इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं आहे. इंग्लंडने दुसऱ्या सत्रापर्यंत  6 बाद 91 धावा केल्या आहेत. यामुळे या सामन्यावर टीम इंडियाने घट्ट पकड मिळवली आहे.

  • 06 Mar 2021 01:44 PM (IST)

    इंग्लंडला सहावा धक्का

    इंग्लंडने सहावी विकेट गमावली आहे.  कर्णधार जो रुट आऊट झाला आहे.  जो रुटने 30 धावांची खेळी केली.

  • 06 Mar 2021 01:40 PM (IST)

    इंग्लंडला पाचवा धक्का

    इंग्लंडने पाचवी विकेट गमावली आहे. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर  विकेटकीप पंतने ओली पॉपला स्टंपिंग आऊट केलं आहे. पोपने 15 धावा केल्या.

  • 06 Mar 2021 01:13 PM (IST)

    मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, पोलीस पथक आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात चर्चा

    ठाणे : कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयात मनसुख हिरेन यांच्या पोस्टमॉर्टम अहवालाबाबत पोलिसांच्या पथकाची रुग्णालयाच्या HOD सोबत चर्चा सुरूच

    सहायक पोलीस आयुक्त (ACP) नीता पाडवी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड चर्चेसाठी उपस्थित

    केमिकल अ‌ॅनालायसीस (CA) झाल्याशिवाय माहिती देणे शक्य नाही

    केमिकल अ‌ॅनालायसीससाठी नमुने कलीना फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याची एसीपी नीता पाडवी यांची माहिती

    तसेच पोस्टमॉर्टम अहवाला संदर्भातील निष्कर्ष राखून ठेवण्यात आले आहेत

    पोलिसांनी ही माहिती दिली तोंडी  आहे. त्यांनी कॅमऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

  • 06 Mar 2021 12:55 PM (IST)

    इंग्लंडला चौथा झटका

    अक्षर पटेलने इंग्लंडला चौथा धक्का दिला आहे. अक्षरने आक्रमक  बेन स्टोक्सला आऊट केलं आहे. स्टोक्स 2 धावा करुन माघारी परतला.

  • 06 Mar 2021 12:49 PM (IST)

    इंग्लंडला तिसरा धक्का

    इंग्लंडला तिसरा धक्का बसला आहे.  डॉमनिक सिबले माघारी परतला आहे. अक्षर पटेलने सिबलेला 3 धावावंर विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 06 Mar 2021 12:32 PM (IST)

    अश्विनचा इंग्लडला दणका, बॅक टु बकॅ 2 विकेट्स

    अश्विनने इंग्लंडला दुहेरी धक्का दिला आहे. अश्विनने इग्लंडला सलग 2 चेंडूत 2 धक्के दिले. अश्विनने सलामीवीर झॅक क्रॉलीला आऊट केल्यानंतर पुढील चेंडूवर जॉनी बेयरस्टोला शून्यावर बाद केलं. त्यामुळे इंग्लंडची 10 बाद 2 अशी स्थिती झाली आहे.

  • 06 Mar 2021 12:29 PM (IST)

    इंग्लंडला पहिला धक्का

    इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. झॅक क्रॉली आऊट झाला आहे. अश्विनने क्रॉलीला 5 धावांवर आऊट केलं.

  • 06 Mar 2021 12:12 PM (IST)

    इंग्लंडच्या दुसऱ्या डावात लंचपर्यंत बिनबाद 6 धावा

    तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रातील लंचपर्यंत इंग्लंडने बिनबाद 6 धावा केल्या. इंग्लंड अजूनही 154 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडकडून डॉम सिबली आणि जॅक क्रॉली सलामी जोडी मैदानात नाबाद खेळत आहेत. त्याआधी टीम इंडियाचा पहिला डाव 365 धावांवर आटोपला आहे. यासह भारताने दुसऱ्या डावात 160 धावांची आघाडी घेतली आहे.

  • 06 Mar 2021 11:21 AM (IST)

    इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात

    इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात झाली आहे. डॉम सिबली आणि झॅक क्रॉली सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 06 Mar 2021 11:17 AM (IST)

    पहिल्या डावात भारताच्या 365 धावा

    टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 365 धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने 160 धावांची  आघाडी घेतली आहे. या पहिल्या डावात टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 101 धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदर दुर्देवी ठरला. इतर फलंदाजांनी त्याला योग्य साथ न दिल्याने तो पुन्हा एकदा एकाच मालिकेत शतकापासून वचिंत राहिला. सुंदरने नाबाद 96 धावांची खेळी केली.

  • 06 Mar 2021 11:08 AM (IST)

    टीम इंडियाला नववा धक्का

    अक्षर पटेल बाद झाल्यानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. इशांत शर्मा शून्यावर आऊट झाला आहे.

  • 06 Mar 2021 11:05 AM (IST)

    अक्षर पटेल रनआऊट, भारताला आठवा धक्का

    टीम इंडियाला आठवा धक्का बसला आहे. अक्षर पटेल चोरटी धाव काढण्याच्या नादात रनआऊट झाला आहे. अक्षरने 43 धावांची खेळी केली.

  • 06 Mar 2021 10:58 AM (IST)

    वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलची आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी

    वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या जोडीने आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. टीम इंडियाने यासह 150 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. सुंदर शतकाच्या तर अक्षर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे.

  • 06 Mar 2021 10:50 AM (IST)

    टीम इंडियाच्या 350 धावा पूर्ण

    टीम इंडियाने 350 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यासह भारताने 145 धावांची आघाडी घेतली आहे. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर ही सेट जोडी मैदानात खेळत आहेत. सुंदरला शतकाची तर  अक्षरला अर्धशतकी खेळी करण्याची संधी आहे.

  • 06 Mar 2021 10:14 AM (IST)

    अक्षर पटेलचा क्लास सिक्स

    अक्षर पटेलने जॅक लीचत्या बोलिंगवर क्लास सिक्सर खेचला आहे. यासह अक्षर 32 धावांवर पोहचला आहे. अक्षरचं हे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे त्यालाही मोठी खेळी करण्याची संधी आहे.

  • 06 Mar 2021 09:50 AM (IST)

    आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. वॉशिंग्टन सुंदरने षटकार आणि चौकार खेचत 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. सुंदरला शतक करण्याची नामी संधी आहे. त्यामुळे वॉशिंग्टनकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

  • 06 Mar 2021 09:47 AM (IST)

    वॉशिंग्टनचा 'सुंदर' षटकार, टीम इंडियाकडे 100 धावांची आघाडी

    वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या दिवसाची झोकात सुरुवात केली आहे. सुंदरने डॉम बेसच्या गोलंदाजीवर सिक्सर खेचला.  यासह टीम इंडियाने 100 धावांची  आघाडी घेतली.

  • 06 Mar 2021 09:41 AM (IST)

    अक्षर पटेलचा चौकार

    अक्षर पटेलने तिसऱ्या दिवसातील पहिला चौकार लगावला आहे. अक्षरने डॉम बेसच्या बोलिंगवर हा चौकार खेचला.

  • 06 Mar 2021 09:36 AM (IST)

    मेडन ओव्हरने सुरुवात

    इंंग्लंडसाठी जेम्स अँडरसनने तिसऱ्या दिवसातील पहिली ओव्हर टाकली. अँडसनने मेडन ओव्हर टाकत सुरुवात केली.

  • 06 Mar 2021 09:35 AM (IST)

    तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानात खेळत आहेत.

Published On - Mar 06,2021 4:33 PM

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.