India Vs England 2021 : विराट कोहलीकडून ‘त्या’ चुकीची वारंवार पुनरावृत्ती, नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 03, 2021 | 3:20 PM

इंग्लंडचा कर्णधार जो रूट जेव्हा आयसीसी क्रमवारीत अव्वल खेळाडू बनला आणि भारतीय कर्णधारही त्याचा सहकारी रोहित शर्माच्या मागे पडला, तेव्हा त्याला कसोटीत मोठ्या धावा न केल्याचा फटका सहन करावा लागला.

India Vs England 2021 : विराट कोहलीकडून त्या चुकीची वारंवार पुनरावृत्ती, नेमकं काय घडलं?
Follow us on

नवी दिल्लीः भारतीय कर्णधार (Indian Cricket Team Captain) विराट कोहली हा नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे अनेक जण त्याच्या बॅटिंगकडे डोळे लावून बसलेले असतात. 2019 नंतर त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाची तो वाट पाहत आहे. दरम्यान, अनेक फलंदाज आणि अगदी गोलंदाजांनी शतके केली, पण कोहलीची बॅट अद्यापही तिहेरी अंक गाठू शकलेली नाही.

इंग्लंड विरुद्ध द ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या सध्याच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय कर्णधार पहिल्या डावात 50 धावा केल्यावर बाद झाला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट जेव्हा आयसीसी क्रमवारीत अव्वल खेळाडू बनला आणि भारतीय कर्णधारही त्याचा सहकारी रोहित शर्माच्या मागे पडला, तेव्हा त्याला कसोटीत मोठ्या धावा न केल्याचा फटका सहन करावा लागला. ओव्हलवर पहिल्या डावात 50 धावा केल्यावर कोहलीने अशी चूक केली, ज्यामुळे त्याची जगासमोर शरमेनं मान खाली गेली. अशी कृती ज्यावर विश्वास ठेवणे खूपच कठीण आहे.

विशेष म्हणजे कोहली मालिकेत फक्त सहा वेळा फलंदाजीसाठी आला

खरं तर विराट कोहली ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात 50 धावा करून ओली रॉबिन्सनचा बळी ठरला. यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोच्या हाती झेल देऊन रॉबिन्सनने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मालिकेतील ही सहावी वेळ होती, जेव्हा कोहली बॅटनं झेल देऊन बळी ठरला. विशेष म्हणजे कोहली मालिकेत फक्त सहा वेळा फलंदाजीसाठी आला. म्हणजेच प्रत्येक वेळी यष्टीमागील झेल देऊन त्याने आपली विकेट गमावली. या सामन्यात फलंदाज आपल्या बॅटनं बाहेरचा चेंडू मारायला जातो आणि यष्टीरक्षकाच्या हाती झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परततो, यासारखा दुसरा लज्जास्पद प्रकार असू शकत नाही.

तीच चूक पुन्हा पुन्हा कशासाठी?

मालिकेच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली नॉटिंगहॅम कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर जेम्स अँडरसनने त्याला यष्टीरक्षक जोस बटलरच्या हाती झेलबाद केले. यानंतर पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे खेळता आला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. कोहलीची फलंदाजी दुसऱ्या डावात फळाला येऊ शकली नाही. त्यानंतर दुसरी कसोटी लॉर्ड्सवर खेळली गेली. या सामन्याच्या पहिल्या डावात विराटच्या बॅटनं 42 धावा केल्या. त्यानंतर ऑली रॉबिन्सनने त्याला पहिल्या चेंडूवर जो रूटकरवी झेलबाद केले. यानंतर विराटने दुसऱ्या डावात 20 धावा केल्या आणि या धावसंख्येवर त्याला यष्टीरक्षक जोस बटलरने सॅम कुरनतर्फे झेलबाद केले.

हेडिंग्लेवरची परिस्थिती आणखी बिघडली

हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहली जेम्स अँडरसनच्या चेंडूवर यष्टीरक्षक जोस बटलरला झेल देऊन आऊट झाला आणि त्याने केवळ 7 धावा केल्या. दुसऱ्या डावात परिस्थिती फारशी बदलली नाही आणि यावेळी त्याची ओली रॉबिन्सनच्या चेंडूवर जो रूटला कॅच देऊन विकेट गेली. कोहलीच्या बॅटने 55 धावा केल्या, पण तो टीम इंडियाला अडीच दिवसात हा सामना गमावण्यापासून वाचवू शकला नाही. त्यानंतर ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहली झेलबाद झाला. यावेळी गोलंदाज ओली रॉबिन्सन होता आणि यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोच्या हाती कोहलीनं झेल दिला होता. विराट आधीच मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत त्याने ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू खेळताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून बाद होण्याची ही मालिका त्याला थांबवता येऊ शकेल.

संबंधित बातम्या

IND vs ENG : फलंदाजी सुधारण्यासाठी अजिंक्य रहाणेला मिळाला ‘हा’ महत्वाचा सल्ला

Tokyo Paralympics : भारताचा धमाका सुरुच, आणखी एक पदक, प्रवीण कुमारला उंच उडीत रौप्य

India Vs England 2021 Virat Kohli’s repeated ‘that’ mistake, what exactly happened?