Tokyo Paralympics : भारताचा धमाका सुरुच, आणखी एक पदक, प्रवीण कुमारला उंच उडीत रौप्य
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारताचा धमाका सुरुच आहे. भारताचा अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकलं आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे.
टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) भारताचा धमाका सुरुच आहे. भारताचा अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकलं आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदकं जिंकली होती. आता प्रवीण कुमारच्या पदकासह भारताच्या ताफ्यात 11 वं पदक जमा झालं आहे. यामध्ये 6 रौप्य पदकांचा समावेश आहे.
प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत 2.07 मीटरची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला आहे. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने 2.10 मीटरसह सुवर्ण, तर पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने 2.04 मीटरसह कांस्य पदक जिंकले.
भाराताला आतापर्यंत 11 पदकं
पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या आता 11 झाली आहे. भारताच्या खात्यात दोन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्य पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिकच्या एका वर्षातील ही भारताची सर्वोत्तम संख्या आहे. भारताने रिओ 2016 आणि 1984 च्या पॅरालिम्पिकमध्ये प्रत्येकी चार पदके जिंकली होती.
Praveen Kumar (Sport Class T44) wins silver medal in men’s high jump at Tokyo Paralympics
“I performed my personal best. I would like to thank my coach, Dr. Satyapal Singh who has supported and motivated me. I also want to thank SAI, PCI and my family,” he says. pic.twitter.com/nEGsSiBaGM
— ANI (@ANI) September 3, 2021
प्रवीणने आधी 1.83 मीटर, नंतर 1.88 मीटर उंच झेप घेतली. त्यानंतर त्याने 1.93 मीटर आणि 1.97 मीटरच्या मार्कला स्पर्श केला. प्रवीण त्याच्या पहिल्या प्रयत्नात 2.01 मीटर उंच उडी घेण्यात अयशस्वी झाला, परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्याने पार केला. त्यानंतर पहिल्या प्रयत्नात त्याने 2.04 मीटर पार केले. 2.07 मीटरचा टप्पाही त्याने पहिल्याच प्रयत्नात पार केला. त्यानंतर बार 2.10 मीटर पर्यंत वाढवण्यात आला, मात्र प्रवीण सर्व 3 प्रयत्नांमध्ये पार करण्यात अयशस्वी ठरलला. ब्रूम-एडवर्ड्सने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात उंच उडी घेत सुवर्णपदकावर मोहर उमटवली.
संबंधित बातम्या
Tokyo Paralympics मधील सुवर्णपदक विजेत्या सुमित अंतिलला Mahindra कस्टम मेड स्पेशल XUV गिफ्ट करणार