जखमी गुडघ्यातून भळाभळा रक्त वाहत असतानाही तो गोलंदाजी करत राहिला, जाँबाज अँडरसनचं नेटकऱ्यांकडून कौतुक

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं, जे पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांसह घरी टीव्हीवर सामना पाहणारे सगळेच प्रेक्षक स्तब्ध झाले.

जखमी गुडघ्यातून भळाभळा रक्त वाहत असतानाही तो गोलंदाजी करत राहिला, जाँबाज अँडरसनचं नेटकऱ्यांकडून कौतुक

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं, जे पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांसह घरी टीव्हीवर सामना पाहणारे सगळेच प्रेक्षक स्तब्ध झाले. इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन रक्तबंबाळ गुडघ्यासह मैदानात खेळत होता. 39 वर्षीय वेगवान गोलंदाजाची ट्राऊजर गुडघ्याजवळ रक्ताने माखली होती तरीही तो गोलंदाजी करत राहिला. (James Anderson’s Knee Bleeds As He Falls on Ground, Veteran Keeps Bowling)

भारतीय डावाच्या 42 व्या षटकात ही घटना घडली. तेव्हा कर्णधार विराट कोहली (50) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (5) भारतीय डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, जेम्स अँडरसनला ही दुखापत कधी आणि कशी झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अँडरसन जखमी झाल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते त्यांच्या स्पीड स्टारच्या धैर्याचे कौतुक करत आहेत. काहींनी या प्रसंगाची तुलना शेन वॅट्सनशी केली आहे. आयपीएलच्या मागील हंगामात वॅट्सनदेखील असाच पायाला जखम झालेली असताना फलंदाजी करत होता.

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाची स्थिती अत्यंत वाईट आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी इंग्लंडमधील ओव्हल मोदानात सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. जो इंग्लंडच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकला आहे. सध्या सुरु असलेला चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. भारतीय संघ सध्या फलंदाजी करत असून भारताची 6 बाद 127 अशी अवस्था झाली आहे. भारताकडून आतापर्यंत कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली आहे. सध्या रिषभ पंत आणि शार्दुल ठाकूर मैदानात आहेत. आजच्या दिवसातील तिसऱ्या सत्राला नुकतीच सुरुवात झाली आहे.

इतर बातम्या

IND vs ENG : भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधत उतरले मैदानात, ‘हे’ आहे कारण

IND vs ENG : अजिंक्यच्या प्रसंगावधानामुळे विराटला जीवदान, तिसऱ्या कसोटीतील हा किस्सा तुम्हाला माहित आहे का?

IND vs ENG : विराटला बाद केल्यानंतर जेम्स अँडरसनचा खुलासा, म्हणाला त्याला दाखवायचं होतं की…

(James Anderson’s Knee Bleeds As He Falls on Ground, Veteran Keeps Bowling)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI