IND vs ENG : अजिंक्यच्या प्रसंगावधानामुळे विराटला जीवदान, तिसऱ्या कसोटीतील हा किस्सा तुम्हाला माहित आहे का?

पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णीत सुटली. त्यानंतर दुसरी कसोटी भारताने तर तिसरी कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. त्यामुळे स्पर्धेत सध्या दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीत आहेत. उर्वरीत सामन्यात विराटच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

IND vs ENG : अजिंक्यच्या प्रसंगावधानामुळे विराटला जीवदान, तिसऱ्या कसोटीतील हा किस्सा तुम्हाला माहित आहे का?
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 2:57 PM

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात हेंडिग्ले येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत(India Vs England, 3rd Test) एक डाव आणि 76 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. पण याच सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीयांसाठी एक सकारात्मक गोष्ट देखील घडली. भारतीय चाहते आपला लाडका कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकाची वाट पाहत आहेत. पण विराटला अर्धशतक मारणं ही अवघड झालं आहे. अशावेळी तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात विराटने संयमी खेळी करत अर्धशतक लगावलं. पण या अर्धशतकात उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचंही काहीसं योगदान आहे.

तर झालं असं विराट आणि रहाणे दोघे फलंदाजी करत होते. दरम्यान 87 वी ओवर अँडरसन टाकत होता. त्याचवेळी कोहलीला त्याने टाकलेला एक चेंडू कोहलीला नीट मारता आला नाही आणि तो थेट विकेटकिपर जोस बटलरच्या हातात गेला. अँडरसनच्या अपीलनंतर पंचानीही बाद निर्णय दिला. कोहलीलाही नीट काही कळाले नाही आणि तो तंबूकडे परतू लागला. त्याच क्षणी रहाणेने कोहलीला डीआरएस घेऊन तिसऱ्या पंचाची मदत घेण्यास सांगितली. त्यावेळी बॅटला चेंडू लागला नसल्याचे समोर आले. ज्यानंतर कोहलीला नाबाद घोषित करण्यात आले. त्यानंतर कोहलीने अर्धशतक केले पण काही वेळातच तो बाद झाला. पण कोहलीच्या अर्धशतकामुळे भारतीय संघासह चाहत्यांना झालेल्या आनंदात रहाणेचा मोठा वाटा असून अनुभव यालाच म्हणतात असं म्हणाव लागेल.

विराटकडे दोन कसोटी सामने शिल्लक

विराट कोहलीचा हा तिसरा इंग्लंड दौरा आहे. याआधी 2014 मध्येही तो इंग्लंड दौऱ्यात अतिशय वाईटरित्या नापास झाला होता. तेव्हाही जेम्स अँडरसनने त्याला सतत बाद केले होते. मात्र 2018 च्या दौऱ्यात विराटने अप्रतिम पुनरागमन केलं.  दोन शतकं ठोकत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 2021 मध्येही विराट 2014 प्रमाणे अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरीत दोन सामन्यात विराटने काही खास कामगिरी केल्यासच त्याचा दौरा यशस्वी जाऊ शकतो.

हे ही वाचा :

IND vs ENG: मोईन अलीने घेतल्या 9 विकेट्स, भारतावर पराभवाची नामुष्की, इंग्लंडच्या ‘त्या’ विजयाची पुनरावृत्ती?

ICC Test Rankings: जो रूट फलंदाजीचा नवा बादशाह, जागतिक क्रमवारीत रोहितची ऐतिहासिक भरारी, विराट मात्र पिछाडीवर

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

(Ajinkya rahane asked Virat to take DRS in Third match which changes Virats out decision to Not out)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.