Tokyo Paralympics मधील सुवर्णपदक विजेत्या सुमित अंतिलला Mahindra कस्टम मेड स्पेशल XUV गिफ्ट करणार

टोकियो ऑलिम्पिक 2020 आणि पॅरालिम्पिकमधील भारताच्या तीन सुवर्णपदक विजेत्यांना विशेष डिझाइन करण्यात आलेल्या XUV700 SUV दिल्या जातील अशी घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली आहे.

Tokyo Paralympics मधील सुवर्णपदक विजेत्या सुमित अंतिलला Mahindra कस्टम मेड स्पेशल XUV गिफ्ट करणार
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 8:04 PM

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक 2020 आणि पॅरालिम्पिकमधील भारताच्या तीन सुवर्णपदक विजेत्यांना विशेष डिझाइन करण्यात आलेल्या XUV700 SUV दिल्या जातील अशी घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली आहे. याला Mahindra XUV700 Javelin Edition असे नाव देण्यात आले आहे. येत्या काही आठवड्यांत ही एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे. टीम इंडियासाठी सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्रा, अवनी लेखारा आणि सुमित अंतिल यांच्यासाठी XUV700 च्या विशेष आवृत्तीचे फक्त तीन युनिट तयार केले जातील. (Anand Mahindra wil gift custom made XUV700 SUV to Paralympic Gold Medalist Sumit Antil)

महिंद्राने अलीकडेच ‘Javelin’ नावाचे ट्रेडमार्क केले आहे आणि आज महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे पुष्टी केली आहे की, हे नाव आगामी XUV700 SUV च्या विशेष आवृत्तीत वापरले जाईल. आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य डिझाईन अधिकारी (ऑटो आणि फार्म सेक्टर) प्रताप बोस यांना जॅवलिन एडिशन एसयूव्ही तयार करण्याची विनंती केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्णपदक जिंकवून दिलं होतं. या पदकाची चमक डोळ्यांसमोर असतानाच टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) भारताचा पॅरा एथलीट भालाफेकपटू सुमित अंतिलने (Sumit Antil) पुरुष भालाफेक F64 स्पर्धेत एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. यंदाच्या पॅरालिम्पिकमधील हे भारताचं दुसरं सुवर्णपदक असून सर्व देशभरातून सुमितवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सुमितने अगदी जोशमध्ये येत केलेल्या थ्रोने फक्त सुवर्णपदकच नाही मिळवून दिलं तर एक नवा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला. सुमितचा सहा पैकी पाचव्या प्रयत्नातील 68.55 मीटरचा थ्रो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. या थ्रोनंतर सुमितने अगदी सिंहासारखी फोडलेली डरकाळी खरच पाहण्याजोगी होती.

असे होते सुमितचे थ्रो

सुमितने या स्पर्धेत एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळेस स्वत:चेच वर्ल्ड रेकॉर्ड तोडले. स्पर्धेत सहा प्रयत्नातील पहिला थ्रो सुमितने 66.95 मीटर लांब फेकला. या थ्रोसह त्याने 2019 मध्ये दुबईत बनवलेले स्वत:चे रेकॉर्ड तोडले. दुसरा थ्रो त्याने 68.08 मीटर लांब फेकला ज्यानंतर तिसरे आणि चौथा प्रयत्न इतका खास झाला नाही. पण पाचव्या प्रयत्नात अप्रतिम असा 68.55 मीटरचा थ्रो करत त्याने सुवर्णपदकाला गवासणी घातली. सोबतच एक नवं वर्ल्ड रेकॉर्डही सेट केलं.

मोदींसह अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सुमीतच्या या सुवर्ण कामगिरीनंतर देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेकांनी सुमितला ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर बातम्या

Tata Motors चा बाजारात धुमाकूळ, ऑगस्टमधील वाहनांच्या विक्रीत 53 टक्क्यांची वाढ

ऑगस्ट महिन्यात वाहन कंपन्यांची जोरदार कमाई, मारुती सुझुकी, ह्युंडई, स्कोडाच्या विक्रीत वाढ

Auto Sales August : ऑटो सेक्टर रुळावर, बजाज, MG मोटर्स, टोयोटाची विक्री वाढली

(Anand Mahindra wil gift custom made XUV700 SUV to Paralympic Gold Medalist Sumit Antil)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.