ऑगस्ट महिन्यात वाहन कंपन्यांची जोरदार कमाई, मारुती सुझुकी, ह्युंडई, स्कोडाच्या विक्रीत वाढ

कोरोना महामारीने हैराण झालेला वाहन उद्योग हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. बहुतांश वाहन कंपन्यांनी ऑगस्टमध्ये चांगली विक्री केली आहे. दरम्यान, ह्युंडई, मारुती सुझुकी, आणि स्कोडा या कंपन्यांनी बाजारात चांगली कामगिरी केली आहे.

ऑगस्ट महिन्यात वाहन कंपन्यांची जोरदार कमाई, मारुती सुझुकी, ह्युंडई, स्कोडाच्या विक्रीत वाढ

मुंबई : कोरोना महामारीने हैराण झालेला वाहन उद्योग हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. बहुतांश वाहन कंपन्यांनी ऑगस्टमध्ये चांगली विक्री केली आहे. दरम्यान, ह्युंडई, मारुती सुझुकी, आणि स्कोडा या कंपन्यांनी बाजारात चांगली कामगिरी केली आहे. ऑटोमोबाईल कंपनी ह्युंडई मोटर इंडियाची ऑगस्टमधील विक्री 12.3 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. (Maruti suzuki, hyundai motor reported increase in sales in august 2021)

ह्युंडईने सांगितले की, कंपनीचा क्युमुलेटिव सेल ऑगस्ट 2020 मध्ये 52,609 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात 59,068 युनिट्सपर्यंत वाढला आहे. भौगोलिकदृष्ट्या, देशांतर्गत विक्री गेल्या वर्षी याच कालावधीत 45,809 युनिट्स इतकी होती, ही विक्री आता 46,866 युनिट्सपर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे कंपनीने ऑगस्ट 2020 मध्ये परदेशात 6,800 युनिट्सची विक्री केली होती. यंदा हिच विक्री 12,202 युनिट्स इतकी झाली आहे.

ह्युंडई मोटर इंडियाने ऑगस्ट 2021 महिन्यात देशांतर्गत बाजारात 46,866 युनिट्सची विक्री केली आहे. तर 12,202 युनिट्सची निर्यात नोंदवली आहे. त्यामुळे कपनीने या महिन्यात एकूण 59,068 युनिट्सची एकत्रित विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या संख्येच्या तुलनेत देशांतर्गत बाजारात केलेल्या विक्रीत कंपनीने 2.3 टक्के वाढ नोंदवली आहे. तर एकूण विक्री 12.3 टक्क्यांनी वाढली आहे.

मारुती सुझुकीच्या विक्रीत वाढ

ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडियाची एकूण विक्री ऑगस्टमध्ये 1,30,699 इतकी नोंदवण्यात आली आहे जी 2020 च्या याच महिन्यात 1,24,624 युनिट्स इतकी होती. ऑगस्ट महिन्यात एकूण विक्रीमध्ये 1,05,775 युनिट्सची घरगुती विक्री, 4,305 युनिट्सच्या इतर ऑरिजनल इक्विपमेंट मॅनुफॅक्चरर (OEMs) ऑफ-टेक आणि 20,619 युनिट्सची निर्यात यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे ऑगस्ट 2021 मध्ये कंपनीच्या विक्रीचे प्रमाण प्रभावित झाले आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. प्रतिकूल परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी कंपनीने सर्व शक्य उपाय केले आहेत.

इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे ऑगस्ट 2021 मध्ये विक्रीच्या प्रमाणावर परिणाम झाला, तर ऑगस्ट 2020 मध्ये विक्रीच्या प्रमाणावर कोव्हिड -19 संबंधित अडथळ्यांमुळे परिणाम झाला.

बजाज, MG मोटर्स, टोयोटाची विक्री वाढली

बजाज ऑटो, टोयोटा किर्लोस्कर, एमजी मोटर्सने ऑगस्ट 2021 दरम्यान त्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली, तर एस्कॉर्ट्सने म्हटले आहे की, त्यांच्या ट्रॅक्टर्सच्या विक्रीत 21.7 टक्के घट झाली आहे. विविध कंपन्यांनी त्याच्या ऑगस्ट महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. बजाज ऑटोने म्हटले आहे की, ऑगस्ट 2021 मध्ये त्यांची एकूण विक्री पाच टक्क्यांनी वाढून 3,73,270 युनिट झाली. कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात एकूण 3,56,199 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने म्हटले आहे की, त्याची अंतर्गत विक्री सात टक्क्यांनी घसरून 1,72,595 युनिट झाली आहे.

बजाज ऑटोने म्हटले आहे की, त्यांची एकूण दुचाकी विक्री पाच टक्क्यांनी वाढून 3,38,310 युनिट्सवर गेली आहे जी मागील वर्षी याच महिन्यात 3,21,058 युनिट्स इतकी होती. कंपनीने सांगितले की, त्यांच्या निर्यातीत 18 टक्के वाढ झाली आहे, तर देशांतर्गत विक्री 7 टक्क्यांनी घटली आहे. कृषी यंत्रसामग्री आणि बांधकाम उपकरणे निर्माती कंपनी एस्कॉर्ट्सने सांगितले की, ऑगस्टमध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीत 21.7 टक्क्यांनी घट झाली आणि या कालावधीत 5,693 युनिट्सची विक्री होऊ शकली.

इतर बातम्या

Tesla च्या चार इलेक्ट्रिक गाड्यांना भारतात मंजुरी, लवकरच लाँचिंग

धमाकेदार ऑफर! 1 लाखाची Bajaj Pulsar 180 बाईक अवघ्या 35 हजारात

दमदार फीचर्ससह TVS Apache RR 310 स्पोर्ट्स बाईक लाँच, किंमत…

(Maruti suzuki, hyundai motor reported increase in sales in august 2021)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI