दमदार फीचर्ससह TVS Apache RR 310 स्पोर्ट्स बाईक लाँच, किंमत…

TVS Motor ने Apache RR 310 चं अपडेटेड व्हर्जन भारतात 2.60 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केलं आहे. टीव्हीएसने येथे फ्रंट आणि रियर सस्पेंशनमध्ये बदल केला आहे.

दमदार फीचर्ससह TVS Apache RR 310 स्पोर्ट्स बाईक लाँच, किंमत...

मुंबई : TVS Motor ने Apache RR 310 चं अपडेटेड व्हर्जन भारतात 2.60 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केलं आहे. दुचाकी उत्पादक कंपनीचे हे प्रमुख उत्पादन अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये, मजबूत पॉवर आउटपुट आणि रेस रेप्लिका ग्राफिक्ससह भारतात सादर करण्यात आलं आहे. यामध्ये तुम्हाला नवीन कलर थीम देखील मिळते. टीव्हीएस मोटर कंपनीने अपाचे आरआर 310 चे बुकिंग सुरू केले आहे. (2021 TVS Apache RR 310 now customisable, launched at 2.59 lakh rupees)

टीव्हीएसने येथे फ्रंट आणि रियर सस्पेंशनमध्ये बदल केला आहे. कंपनीने आता पूर्णपणे अॅडजस्टेबल सस्पेंशन दिले आहे जे समोर आणि मागील दोन्ही बाजूला आहे. त्याच वेळी, रायडर स्वतःच्या हिशेबाने प्रीलोड अॅडजस्ट करू शकतो. 2021 अपाचे आरआर 310 हे कंपनीचे पहिले टीव्हीएस उत्पादन आहे जे पर्सनलायजेशन आणि कस्टमायजेशन प्लॅटफॉर्म TVS बिल्ट टू ऑर्डरच्या रुपात येतं.

कस्टमायजेशन ऑप्शन उपलब्ध

टीव्हीएस कंपनी ग्राहकांना दोन कस्टमायजेशन पर्याय देते, जे अपाचे आरआर 310 मध्ये उपलब्ध आहेत. यात पूर्णपणे अॅडजस्टेबल केवायबी फ्रंट फोर्क, पूर्णपणे अॅडजस्टेबल रिअर मोनो शॉक आणि अँटी रस्ट कोटेड ड्राइव्ह चेन मिळते. हे सर्व कंपनीच्या डायनॅमिक किटचा भाग आहे. टीव्हीएस रेस किटचा एक भाग म्हणून ट्रॅक एर्गोनॉमिक्स देखील ऑफर करते जे टक्ड डाउन रेस हँडल बार, फुट पेग्स आणि हाय लीन अँगलसाठी एर्गो फुट रेस्ट असेंबलीसह येते.

फीचर्स

टीव्हीएस येथे अॅलॉय व्हील कलर ऑप्शन्स आणि पर्सनलाइज्ड रेस नंबरसह रेस रेप्लिका ग्राफिक्स देखील देत आहे. बाईकमध्ये दिलेल्या डिजिटल क्लस्टर युनिटला एक डिजिटल डॉकही देण्यात आलं आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे ठेवू शकता. याशिवाय, तुम्हाला डे ट्रिप मीटर, डायनॅमिक रेव्ह लिमिट इंडिकेटर आणि ओव्हरस्पीड इंडिकेटर मिळतात.

दमदार इंजिन

नवीन अपाचे आरआर 310 मध्ये 310 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे बीएमडब्ल्यू जी 310 आर इंजिनवर आधारित आहे. हे तुम्हाला 34hp पॉवर आणि 27.3Nm पीक टॉर्क देते. इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. वाहनात थ्रॉटल बाय वायर तंत्रज्ञान, चार डेडिकेटेड रायडिंग मोड, मिशेलिन रोड 5 टायर्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणारी नवीन टीएफटी स्क्रीन मिळते. 2021 अपाचे आरआर 310 ही बाईक बाजारात केटीएम आरसी 390, कावासाकी निंजा 300 आणि बेनेली 302 आरशी स्पर्धा करेल.

इतर बातम्या

हॉर्नचा सूर बदलणार, भारतीय संगीत वापरलं जाणार; नितीन गडकरी यांची माहिती

कोणकोणती वाहने स्क्रॅप होणार? जाणून घ्या स्क्रॅपिंग धोरणातील निकष

मुंबई मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं, स्वच्छ मुंबईसाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत व्हिजन-2030 ऑनलाईन सर्वेक्षण सुरु

(2021 TVS Apache RR 310 now customisable, launched at 2.59 lakh rupees)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI