AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Auto Sales August : ऑटो सेक्टर रुळावर, बजाज, MG मोटर्स, टोयोटाची विक्री वाढली

बजाज ऑटो, टोयोटा किर्लोस्कर, एमजी मोटर्सने ऑगस्ट 2021 दरम्यान त्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली, तर एस्कॉर्ट्सने म्हटले आहे की, त्यांच्या ट्रॅक्टर्सच्या विक्रीत 21.7 टक्के घट झाली आहे.

Auto Sales August : ऑटो सेक्टर रुळावर, बजाज, MG मोटर्स, टोयोटाची विक्री वाढली
फेस्टिव्ह सिझन सुरू होताच ऑटो कंपन्यांसमोर मोठा पेच
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 3:41 PM
Share

मुंबई : बजाज ऑटो, टोयोटा किर्लोस्कर, एमजी मोटर्सने ऑगस्ट 2021 दरम्यान त्यांच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली, तर एस्कॉर्ट्सने म्हटले आहे की, त्यांच्या ट्रॅक्टर्सच्या विक्रीत 21.7 टक्के घट झाली आहे. विविध कंपन्यांनी त्याच्या ऑगस्ट महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. बजाज ऑटोने म्हटले आहे की, ऑगस्ट 2021 मध्ये त्यांची एकूण विक्री पाच टक्क्यांनी वाढून 3,73,270 युनिट झाली. कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात एकूण 3,56,199 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने म्हटले आहे की, त्याची अंतर्गत विक्री सात टक्क्यांनी घसरून 1,72,595 युनिट झाली आहे. (Auto Sales August : Sales of Bajaj Auto, MG Motor and Toyota increased, Escorts sales dips)

बजाज ऑटोने म्हटले आहे की, त्यांची एकूण दुचाकी विक्री पाच टक्क्यांनी वाढून 3,38,310 युनिट्सवर गेली आहे जी मागील वर्षी याच महिन्यात 3,21,058 युनिट्स इतकी होती. कंपनीने सांगितले की, त्यांच्या निर्यातीत 18 टक्के वाढ झाली आहे, तर देशांतर्गत विक्री 7 टक्क्यांनी घटली आहे. कृषी यंत्रसामग्री आणि बांधकाम उपकरणे निर्माती कंपनी एस्कॉर्ट्सने सांगितले की, ऑगस्टमध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीत 21.7 टक्क्यांनी घट झाली आणि या कालावधीत 5,693 युनिट्सची विक्री होऊ शकली.

MG Motor च्या विक्रीत तब्बल 51 टक्के वाढ

एस्कॉर्ट्सने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांनी एकूण 7,268 युनिट्सची विक्री केली होती. सणासुदीच्या काळात विक्रीत वाढ अपेक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एमजी मोटरने सांगितले की, ऑगस्टमध्ये त्यांची किरकोळ विक्री 51 टक्क्यांच्या वाढीसह 4,315 युनिट्स होती. ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने 2,851 युनिट्सची विक्री केली होती. अशोक लेलँडच्या विक्रीत 48 टक्के वाढ झाली. ऑगस्टमध्ये कंपनीने एकूण 9,360 वाहने विकली.

टोयोटाची विक्री दुप्पट

टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) सांगितले की, ऑगस्ट 2020 च्या तुलनेत यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांची देशांतर्गत घाऊक विक्री दोन पटीने वाढली आणि 12,772 युनिट झाली. कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात 5,555 युनिट्सची विक्री केली होती. टीकेएम जॉइंट जनरल मॅनेजर (सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंग) व्ही. व्हिसेलिन सिगामनी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर त्यांच्या सेगमेंटमध्ये वर्चस्व कायम ठेवत आहेत आणि दोन्ही मॉडेल्सना चांगली मागणी आहे. याशिवाय ग्लान्झा आणि अर्बन क्रूझरलाही चांगली मागणी दिसून येत आहे.

इतर बातम्या

Tesla च्या चार इलेक्ट्रिक गाड्यांना भारतात मंजुरी, लवकरच लाँचिंग

धमाकेदार ऑफर! 1 लाखाची Bajaj Pulsar 180 बाईक अवघ्या 35 हजारात

दमदार फीचर्ससह TVS Apache RR 310 स्पोर्ट्स बाईक लाँच, किंमत…

(Auto Sales August : Sales of Bajaj Auto, MG Motor and Toyota increased, Escorts sales dips)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.