IND vs ENG: टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत आला पण नंतर गायब, मॅचपूर्वीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज रंगणार आहे. यापूर्वीचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

IND vs ENG: टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत आला पण नंतर गायब, मॅचपूर्वीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल
virat kohli
| Updated on: Jul 19, 2026 | 1:30 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना लॉर्ड्सवर होणार आहे. हा सामना 19 जुलै 2026 रोजी म्हणजे आज खेळला जाईल. या भव्य अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ लंडनमध्ये दाखल झाला आहे. सर्व संघ एकत्र प्रवास करतात. सर्व भारतीय खेळाडू बसमधून उतरून हॉटेलमध्ये प्रवेश केले. आता भारतीय संघ जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांचा चाहतावर्ग मोठा असल्याचे नेहमीचं पाहायला मिळाले आहे. आता इथेही बसमधून उतरताच संघाला चाहत्यांनी घेरले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली.

विराट कोहली बसमधून संघासोबत प्रवास केला पण हॉटेलमध्ये तो गेला नाही. विराट कोहली भारतीय संघासोबत हॉटेलमध्ये न जाता, कारमधून निघून गेला. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. विराट लंडनमध्ये राहतो आणि तिथे त्याचे घर आहे. सामना अजून बाकी असल्याने कोहलीने आपल्या लंडनमधील घरी जाण्याचा निर्णय घेतला. सहसा, जेव्हा खेळाडू सामन्यासाठी आपल्या शहरात परत येतात, तेव्हा ते काही काळासाठी घरी जातात. याच कारणामुळे कोहली आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी निघून गेला. आता तो आज पुन्हा संघात सामील होईल.

इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विराटसाठी अतिशय निराशाजनक झालेली दिसली. पहिल्या वनडे मॅचमध्ये तो स्वस्तात बाद झाला होता. मात्र, कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये किंग कोहलीचे शानदार पुनरागमन पाहायला मिळाले. कोहलीने 65 धावांची उत्कृष्ट इनिंग खेळली. इंग्लंडविरुद्धच्या या शेवटच्या मॅचनंतर कोहलीला क्रिकेटमधून मोठा ब्रेक मिळणार आहे. आता तो थेट 27 सप्टेंबरपासून वेस्टइंडिजविरुद्ध खेळताना दिसेल.

विराट आणि रोहितवर विशेष लक्ष असणार आहे. प्रत्येक सामन्यात धावा केल्या तर त्यांना वनडे विश्वचषकासाठी संघात स्थान मिळेल अन्यथा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढले जाईल. ते दोघेही खूप कालावधीनंतर मैदानात उतरताना दिसतात कारण सामने पण खूप कालावधीच्या अंतरानंतर असतात. विराट आणि रोहित आता लॉर्ड्समध्ये चांगले खेळतील अशी अपेक्षा चाहत्यांना आहेत.

Follow Us