Gautam Gambhir : संजू सॅमसन फ्लॉप म्हणून त्याला बसवलं, मग आता कोच गंभीर अजून दोघांच्या बाबतीत असा निर्णय कधी घेणार?

Gautam Gambhir : संजू सॅमसन तीन सामन्यात फ्लॉप ठरला म्हणून त्याला बसवलं. मग टीम इंडियात अजून दोन खेळाडू आहेत, ते सुद्धा असेच अपयशी ठरतायत. मग हेड कोच गौतम गंभीर त्यांच्याबाबतीत असा निर्णय कधी घेणार? कारण संजूला बसवून वैभवला आणलं. पण त्याने काही फरक पडला नाही.

Gautam Gambhir : संजू सॅमसन फ्लॉप म्हणून त्याला बसवलं, मग आता कोच गंभीर अजून दोघांच्या बाबतीत असा निर्णय कधी घेणार?
Gautam Gambhir
| Updated on: Jul 08, 2026 | 3:23 PM

सध्या टीम इंडियासाठी कठीण काळ सुरु आहे. आधी आयर्लंडमध्ये दोन नंतर आता इंग्लंडमध्ये दोन असं मिळून एकूण चार सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 76 धावात आटोपला. पुन्हा एकदा टीम इंडियाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. खासकरुन संजू सॅमसन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये पुन्हा संधी मिळू शकते. तिसऱ्या टी20 सामन्यानंतर हेड कोच गौतम गंभीर यांनी संजू सॅमसनसाठी टीमचे दरवाजे बंद झालेले नाहीत हे स्पष्ट केलं. तो या सीरीजमध्ये पुनरामगन करु शकतो.टीम इंडियाला सलग दुसरा टी20 वर्ल्ड कप जिंकवून देण्याच संजू सॅमसनने महत्वाची भूमिका बजावली होती. पण आता आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात त्याचा फॉर्म हरवला आहे. त्याला सलग तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यात संजूने 5,0 आणि 1 रन्स केला. तिन्ही सामन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या ओव्हरमध्ये तो पॅवेलियनमध्ये परतला. म्हणून त्याला ड्रॉप करण्याची मागणी झाली. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली. पण त्याने सुद्धा परिस्थिती बदलली नाही.

नॉटिंघम येथे तिसर्‍या टी20 सामन्यात टीम इंडियाचा तब्बल 125 धावांनी पराभव झाला. सर्वच फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांसमोर आत्मसमर्पण केलं. हेड कोच गौतम गंभीर पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले. त्यावेळी त्यांना सॅमसनला ड्रॉप करुन पुन्हा टीममध्ये घेण्यासंबंधी प्रश्न झाला. त्यावर गंभीर म्हणाले की, “टी 20 वर्ल्ड कपमधील संजूच योगदान विसरता येणार नाही. पण कधी कधी फॉर्म सुद्धा लक्षात घ्यावा लागतो”

त्यांच्या जागी सॅमसन पुनरागमन करु शकतो का?

“असा काही नियम नाहीय की, संजू पुन्हा या सीरीजमध्ये खेळणार नाही. तो खेळू शकतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रिझल्ट महत्वाचा आहे. ज्या टीम कॉम्बिनेशनमुळे आम्हाला चांगलं निकाल मिळेल, ती प्लेइंग 11 आम्ही उतरवतो. प्रत्येकाला टीममध्ये जागा मिळवावी लागते” असं गौतम गंभीर म्हणाले. गौतम गंभीर यांच्या वक्तव्याचे दोन अर्थ निघतात. एक अपेक्षा आणि दुसरा संशय. संजूच प्रदर्शन चांगलं नाहीय, त्यामुळे तो टीममध्ये स्थान कसं कमावू शकतो? दुसरी बाजू ही आहे की, इशान किशन आणि तिलक वर्मा हे फलंदाज सुद्धा परिणामकारक ठरलेले नाहीत. मग पुढच्या दोन सामन्यांसाठी या दोन खेळाडूंचा टीममधील स्थानावर त्यांचा अधिकार आहे का?. त्यांच्या जागी सॅमसन पुनरागमन करु शकतो का?. गंभीरच्या वक्तव्यामधून अनेक अर्थ निघतात.

Follow Us