India vs England 3rd Test | इंग्लंडच्या कॅप्टनची अफलातून फिरकी, जो रुटचा टीम इंडियाला ‘पंच’, ठरला पहिलाच इंग्रज खेळाडू

| Updated on: Feb 25, 2021 | 5:19 PM

इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) पहिल्या डावात गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेतल्या.

India vs England 3rd Test | इंग्लंडच्या कॅप्टनची अफलातून फिरकी, जो रुटचा टीम इंडियाला पंच, ठरला पहिलाच इंग्रज खेळाडू
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) पहिल्या डावात गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेतल्या.
Follow us on

अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील (India vs England 3rd Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियाला पहिल्या डावात अवघ्या 145 धावांवर रोखले. टीम इंडियाकडून रोहित शर्माने सर्वाधिक 66 धावा केल्या. तर इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने (Joe Root) सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. यासह जो रुट इंग्लंडकडून डे नाईट कसोटीत एका डावात कमी धावा देऊन 5 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला. (india vs england 3rd test 2 nd day joe root become first england bowler who take 5 wickets for 8 runs in day night test)

जो रुटने अवघ्या 6.2 ओव्हरमध्ये गोलंदाजी करत 8 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे रुटने 3 मेडन ओव्हर टाकल्या. रुटने रिषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि जस्प्रीत बुमराहला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. यासह जो रुट इंग्लंडकडून एका डावात डे नाईट कसोटीत सर्वात कमी धावा देऊन 5 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

इंग्लंडकडून डे नाईट कसोटीत कमी धावा देत एका डावात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

1) जो रुट = 8 धावा देत 5 विकेट्स, 2021

2) जेम्स अँडरसन = 43 धावा देत 5 बळी, 2017,

3) ख्रिस वोक्स = 36 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स, 2017

पहिल्या डावात भारताच्या 145 धावा

टीम इंडियाला पहिल्या डावात अवघ्या 145 धावाच करता आल्या. भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 112 धावांवर ऑल आऊट केलं. यामुळे भारताला 33 धावांची आघाडी मिळाली. या डावात भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 66 धावा केल्या. भारताने दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात 3 बाद 99 धावांपासून केली. पण अवघ्या 46 धावांच्या मोबदल्यात भारताने 7 विकेट्स गमावल्या.  रोहित व्यतिरिक्त  टीम इंडियाच्या इतर कोणत्याही  फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

संबंधित बातम्या :

आधी टीम इंडियात निवड, आता रोहित शर्माच्या फेव्हरेट खेळाडूचं वादळ, 58 चेंडूत 133 धावा

Prithvi Shaw : इंग्लंडविरुद्ध वगळलं, मात्र विजय हजारे ट्रॉफीत बरसला, पृथ्वी शॉचा झंझावात, वेगवान 227* धावा

(india vs england 3rd test 2 nd day joe root become first england bowler who take 5 wickets for 8 runs in day night test)