India vs England 5th T20i Preview | टीम इंडिया की इंग्लंड, मालिका कोण जिंकणार?

| Updated on: Mar 20, 2021 | 7:52 AM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा (india vs england 5th t 20i match preview) सामना आज (20 मार्च) खेळवण्यात येणार आहे. मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. यामुळे दोन्ही संघांना मालिका विजयाची समान संधी आहे.

India vs England 5th T20i Preview | टीम इंडिया की इंग्लंड, मालिका कोण जिंकणार?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा (india vs england 5th t 20i match preview) सामना आज (20 मार्च) खेळवण्यात येणार आहे. मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. यामुळे दोन्ही संघांना मालिका विजयाची समान संधी आहे.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (20 मार्च) टी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा (India vs Engaland 5th T20i) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. 5 सामन्यातील मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिका विजयाची संधी दोन्ही संघांना आहे. यामुळे पाचवा सामना मालिकेच्या आणि दोन्ही संघांच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. (india vs england 5th t 20i match preview at narendra modi stadium ahmedabad)

हेड टु हेड रेकॉर्ड?

आतापर्यंत उभय संघात एकूण 18 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 9 सामन्यात टीम इंडियाने इंग्रजांचा पराभव केला आहे. तर 9 सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आकडेवारीनुसार दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे मालिकेतील पाचवा सामना हा अटीतटीचा आणि चुरशीचा होणार आहे.

भारतासमोर जोफ्रा आर्चर आणि मार्क वुडचे आव्हान

टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर या वेगवाग गोलंदाजांचं आव्हान असणार आहे. या दोन्ही गोलंदाजांनी संपूर्ण मालिकेत बोलिंगने प्रभावित केलं आहे. यामुळे या दोघांचा सामना करण्यासाठी भारताला रणनिती करावी लागणार आहे.

रोहित, सूर्यकुमार आणि विराटवर फलंदाजीची जबाबदारी

टीम इंडियाच्या बॅटिंगची जबाबदारी ही सलामीवीर रोहित शर्मा तसेच सूर्यकुमार यादव आणि कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आह. तसेच श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याकडून फटकेबाजीची अपेक्षा असणार आहे.

चांगल्या सुरुवातीची गरज

टीम इंडियाला पाचव्या सामन्यात चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे. चारही सामन्यात टीम इंडियाची सलामी जोडी अपयशी ठरली आहे. पण हा सामना मालिकेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे या मॅचमध्ये सलामी जोडीकडून मोठ्या आणि आश्वासक भागीदारीची अपेक्षा भारतीय चाहत्यांना असणार आहे.

दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. दोन्ही संघात अष्टपैलू आणि आक्रमक खेळाडू आहेत. त्यामुळे या पाचव्या सामन्याचा निकाल काय लागणार आणि ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

विराटसेनेसाठी दिलासादायक बातमी, यॉर्कर किंगचं संघात पुनरागमन, इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज

175 चौकार आणि 46 षटकार, 2 फलंदाजांचा झंझावात, 1500 पेक्षा अधिक धावा, तरीही संघात स्थान नाही

(india vs england 5th t 20i match preview at narendra modi stadium ahmedabad)