VIDEO : ऋषभ पंत आऊट होताच कोहली बाहेर आला आणि रवी शास्त्रींवर बरसला

क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा प्रवास संपला आहे. न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली.

VIDEO : ऋषभ पंत आऊट होताच कोहली बाहेर आला आणि रवी शास्त्रींवर बरसला

श्रीनगर : क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा प्रवास संपला आहे. न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचं आव्हान पार करताना भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज अवघ्या 5 धावात बाद झाले. त्यावेळी युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात आला.

ऋषभ पंतने काही वेळासाठी विकेट थोपवून थरली. मात्र तो अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. एक चुकीचा फटका मारुन पंत माघारी परतला. पंतने 55 चेंडूत 32 धावा केल्या. त्यामुळे पंतच्या फलंदाजीवर आता टीका होत आहेत. भारताकडे महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक यासारखे अनुभवी खेळाडू होते, त्यामुळे 3 विकेट तातडीने गेल्यानंतर, या दोघांपैकी एकाला पंतच्या आधी फलंदाजीला पाठवणे अपेक्षित होते.

पंतने मिशेल सँटेनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कॉलिन डी ग्रँडहोमने त्याचा झेल टिपला आणि तो बाद झाला. पंत बाद झाला त्यावेळी भारताची अवस्था 5 बाद 71 अशी झाली.

पंत बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्येही वातावरण तापलं. कर्णधार विराट कोहली रागारागात बाहेर येऊन बाल्कनीत बसलेले प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी बोलू लागला. कोहली अत्यंत रागात रवी शास्त्रींशी बोलत होता. तो रवी शास्त्रींना एकप्रकारे जाब विचारतोय असंच दिसत होतं.

3 बाद 5 अशी अवस्था असताना, भारताच्या मधल्या फळीने विकेट थोपवून धरणं आवश्यक होतं. जे काम महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जाडेजा यांनी केलं, तेच काम पंत, कार्तिक आणि हार्दिक पंड्याकडून अपेक्षित होतं. मात्र हे तिघेही अपयशी ठरले. त्यामुळे विश्वचषकात अव्वलस्थानी असलेला भारतीय संघ महत्त्वाच्या सामन्यात पराभूत झाला आणि विश्वचषकातील आव्हानच संपुष्टात आलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI