AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: भारत आणि श्रीलंका मालिकेपूर्वी मोठा राडा, भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचताच… काय घडलं?

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी आता श्रीलंकेत एक मोठा राडा झाल्याचे समजत आहे. आता मालिकेपूर्वी असंं घडण्यामागे कारण काय ते जाणून घ्या...

IND vs SL: भारत आणि श्रीलंका मालिकेपूर्वी मोठा राडा, भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचताच... काय घडलं?
| Updated on: Aug 06, 2026 | 1:23 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे, या साठी भारतीय संघा श्रीलंकेला पोहोचला आहे. संघाने आधीच सराव सुरु केला आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ 7 ऑगस्टपासून एक सराव सामना खेळणार आहे. हा सामना कोलंबोच्या नॉनडिस्क्रिप्ट क्रिकेट क्लब (एनसीसी) विरुद्ध होईल. आता या सामन्यापूर्वी एक मोठा वाद निर्माण झाला आहे, खेळपट्टीवरून यापूर्वी वाद निर्माण झाला होता. सराव सामन्याच्या खेळपट्टीवर गवताचा पातळ थर असल्याने भारतीय संघ नाराज आहे, कारण त्यांच्या मते ही खेळपट्टी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी योग्य नाही.  क्लबचा दावा आहे की त्यांनी श्रीलंका क्रिकेटच्या सांगण्यावरून ही खेळपट्टी तयार केली होती. भारत आणि एनसीसी यांच्यातील सराव सामना मूळ नियोजित चार दिवसांऐवजी तीन दिवसांचा असेल.

एनसीसी हा श्रीलंकेचा सर्वात जुना क्रिकेट क्लब आहे, ज्याची स्थापना 1888 मध्ये झाली. भारतीय संघ सध्या येथे सराव करत असून 7 ऑगस्टपासून एक सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघाला श्रीलंकेच्या फिरकीला अनुकूल परिस्थितीसाठी योग्य खेळपट्टीची अपेक्षा होती. सराव सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीवर गवत आहे, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना फायदा होईल आणि फिरकी गोलंदाजांना त्यावर प्रभावी ठरण्यास अडथळा येईल. क्लबचे म्हणणे आहे की त्यांना श्रीलंका क्रिकेटकडून गवताची खेळपट्टी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. येथे फलंदाजांना फायदा होईल आणि नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करावी.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना क्लब मॅनेजरने सांगितले की, “तिसऱ्या दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. अन्यथा, ही खेळपट्टी सामन्यासाठी निर्णायक ठरेल.” भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून गॉल येथे होणार आहे. येथील खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. अलीकडे भारतीय फलंदाजांना फिरकी गोलंदाजीसमोर बरीच अडचण येत आहे. मायदेशात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. 2015 पासून भारताने श्रीलंकेविरुद्ध एकही कसोटी सामना गमावलेला नाही. ही मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी निर्णायक ठरेल. त्यामुळे, भारतीय संघाला श्रीलंकेत निराश व्हायचे नाही.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...