Asian Games 2026 : भारताच्या मुलींची कमाल, पाकिस्तानला वाईट पद्धतीने हरवलं, 10 मिनिटंही नाही टिकू शकल्या

Asian Games 2026 : एशियन गेम्स 2026 चा आज दुसरा दिवस आहे. नेमबाजीत पदक विजेती कामगिरी केल्यानंतर भारताच्या मुलींनी कमाल केली. पाकिस्तानचा महिला संघ समोर टिकूनही शकला नाही.

Asian Games 2026 : भारताच्या मुलींची कमाल, पाकिस्तानला वाईट पद्धतीने हरवलं, 10 मिनिटंही नाही टिकू शकल्या
India Beat Pakistan
| Updated on: Sep 21, 2026 | 12:26 PM

एशियन गेम्स 2026 चा आज दुसरा दिवस आहे. नेमबाजीत पदक विजेती कामगिरी केल्यानंतर भारताच्या टीमने पाकिस्तानला टेबल टेनिसमध्ये 3-0 ने धूळ चारली. पाकिस्तानवर मोठा विजय मिळवून भारताने क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या महिला टीमने आपल्या पहिल्या मॅचमध्ये इंडोनेशियाविरुद्ध 3-0 क्लीन स्वीप केलं. त्यानंतर सिंगापूरच्या टीमला हरवलं. त्यांनी थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. आता तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानची सुद्धा तीच हालत केली. टेबल टेनिसमध्ये बेस्ट ऑफ 5 ला विजेता घोषित केलं जातं. एकूण पाच सामने खेळले जातात. त्यात अधिक विजय मिळवणाऱ्या टीमला विजेता जाहीर केलं जातं. सोमवारी पाकिस्तानची टेबल टेनिस टीम भारतासमोर टिकू शकली नाही.

पहिल्या गेममध्ये सुतीर्था मुखर्जीने केवळ 10 मिनिटांच्या आत अलीना खानला 11-3, 11-3, 11-4 च्या फरकाने हरवलं. दुसऱ्या गेममध्ये सिंड्रेला दासने कालसूम खानला वाईट पद्धतीने हरवलं. 11-6, 11-7, 11-5 सरळ सेटमध्ये विजय मिळवला. भारताला या सामन्यात 2-0 ची आघाडी मिळाली होती. तिसरा सामना श्रीजा अकुला आणि फातिमा खान यांच्यात झाला. उदयोन्मुख स्टार श्रीजाने फातिमाला 11-4, 11-4, 11-5 असं हरवलं. अन्य दोन सामन्यांची गरज पडली नाही. कारण भारताने पाच पैकी पहिले तीन सामने जिंकले.

भारतीय मुलींनी कमाल केली

भारताने ग्रुप एफ मध्ये आपले तिन्ही सामने जिंकून क्वार्ट फायनलमध्ये प्रवेश केला. पहिला सामन्यात इंडोनेशियाला 3-0 ने हरवलं. सिंगापूर विरुद्ध सामन्यात भारताने 3-2 ने विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानला 3-0 ने चिरडून टाकलं. 2022 आशियाई गेम्समध्ये भारताची महिला टीम राऊंड ऑफ 16 मधून आधीच बाहेर गेली होती. पण यावेळी भारतीय मुलींनी कमाल केली. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ते अजिंक्य राहिले.

नेमबाजीत पदक जिंकून भारताने आपलं खातं उघडलं

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या दुसऱ्यादिवशी नेमबाजीत पदक जिंकून भारताने आपलं खातं उघडलं. भारताला मिळालेलं हे तिसरं मेडल आहे. नेमबाजीत भारताला हे पदक मिळालय. याआधीही पहिली दोन्ही मेड्लस भारताने नेमबाजीत मिळवली होती. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल टीम इवेंटमध्ये भारताने सिल्वर मेडल जिंकलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us