क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात मृत्यू, काळीज पिळवटून टाकणारा Video Viral

Video: जम्मू-काश्मीरमध्ये एका क्रिकेटरचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हा क्रिकेटर आपल्या दुचाकीवरून जाताना दिसत आहे आणि अचानक काहीतरी घडते, ज्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.

क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात मृत्यू, काळीज पिळवटून टाकणारा Video Viral
Cricketer
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 24, 2025 | 8:31 PM

आयुष्यात कधी काय होईल, याचा कोणालाही अंदाज नसतो. मृत्यू कधी येईल आणि आपल्याला आपल्या प्रियजनांपासून दूर करेल, हे कोणीही सांगू शकत नाही. असाच काहीसा प्रकार जम्मू-काश्मीरमध्ये एका क्रिकेटरसोबत घडला आहे. हा क्रिकेटर शांतपणे आपल्या मार्गावर जात होता, तेव्हा अचानक काहीतरी घडले आणि या खेळाडूचा मृत्यू झाला. हा घटनेचा अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात राहणाऱ्या क्रिकेटर फरीद हुसैन याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. इंडिया टुडेच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही घटना २० ऑगस्टची आहे, जेव्हा फरीद रस्त्यावरून जात होते, परंतु दुसऱ्याच्या निष्काळजीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

वाचा: त्या अभिनेत्रीसाठी गोविंदा सुनिता देणार घटस्फोट? अभिनेत्याच्या वकिलाने सांगितले सत्य

कसा झाला मृत्यू?

फरीद आपल्या दुचाकीवरून जात होते. ते एका कारच्या बाजूने जात असताना अचानक कार चालकाने गाडीचे दार उघडले आणि फरीद त्याला जाऊन धडकले. धडकेनंतर फरीद गाडीसह काही अंतरापर्यंत फरपटत गेले आणि बाजूला पडले. त्यांना गंभीर जखमा झाल्या आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. जवळच्या लोकांनी त्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला, पण ते फरीद यांचा जीव वाचवू शकले नाहीत. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे फरीद यांना आपला जीव गमवावा लागला, ज्याचा परिणाम निश्चितपणे त्यांच्या कुटुंबावर होईल.

जम्मू-काश्मीरमधील क्रिकेट

जम्मू-काश्मीर हे दहशतवादी कारवायांमुळे लोकांच्या नजरेत असते, पण अलीकडच्या काळात येथून अनेक क्रिकेटर जन्माला आले आहेत. परवेझ रसूल याने जम्मू-काश्मीरमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून नाव कमावले. त्यानंतर उमरान मलिकसारखा वेगवान गोलंदाज येथून बाहेर पडला. उमरान बराच काळ जखमी होता आणि आता तो पुनरागमनाच्या तयारीत आहे. येथून अब्दुल समदसारखा खेळाडू तयारा झाला आहे, ज्याने आयपीएलमध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे.

फरीद यांच्याविषयी

क्रिकेटची आवड असलेल्या फरीद हुसैनला त्याच्या प्रतिभेमुळे उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिलं जात होतं. जम्मू-काश्मीरच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये फरीद हुसैन खेळायचा. जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट वर्तुळातही त्याने नाव कमावलं होतं.