वैभव सूर्यवंशी याला लागली कोणाची नजर, इंडिया ‘अ’ मध्ये पदार्पण करताच मोठा धक्का, पहिल्याच..

Vaibhav Sooryavanshi India debut : वैभव सूर्यवंशी याने आयपीएल गाजवले. धमाकेदार कामगिरी वैभव सूर्यवंशी याने आयपीएलमध्ये केली. थेट त्याची वर्णी टी-20 संघात झाली. वैभव आज भारतीय क्रिकेट संघात खेळत आहे.

वैभव सूर्यवंशी याला लागली कोणाची नजर, इंडिया अ मध्ये पदार्पण करताच मोठा धक्का, पहिल्याच..
Vaibhav Suryavanshi
| Updated on: Jun 09, 2026 | 1:21 PM

15 वर्षीय क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2026 गाजवले. दिग्गज क्रिकेटरची जेवढी चर्चा झाली नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त पट वैभव सूर्यवंशी याच्या नावाची तूफान चर्चा झाली. धमाकेदार खेळ खेळताना वैभव सूर्यवंशी दिसला. आयपीएलमध्ये वैभवने छाप सोडली. वैभवचा खेळ पाहून त्याला थेट भारताच्या टी-20 संघात स्थान मिळाले. निवड समितीने याबाबत निर्णय घेत 15 वर्षाच्या वैभवला थेट भारतीय संघात स्थान दिले. आयपीएल 2026 मधून भारतीय संघाला एक चांगला क्रिकेटर मिळाला. आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीची एक वेगळीच क्रेज बघायला मिळाली. आयपीएलमध्ये चर्चा फक्त वैभवच्या नावाचीच राहिली. त्यानंतर थेट टीम इंडियात त्याला संधी मिळाली. मात्र, यानंतर आता वैभवला कोणाची नजर लागली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

15 वर्षीय वैभव सूर्यवंशी इंडिया ‘अ’ संघाकडून पदार्पण करतानाच अपयशी ठरला. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध डावाची सुरुवात करताना वैभव 12 चेंडूंमध्ये फक्त 14 धावा करून बाद झाला. स्ट्राईक मिळताच त्याने चौकार मारून तशी चांगली सुरूवात केली. वैभवने एका षटकात दोन चौकार मारले पण त्यानंतर वैभव पुढच्याच षटकात आपली विकेट गमावून बसला. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध प्रभसिमरन सिंगने वैभव सूर्यवंशीसोबत फलंदाजी सुरू केली.

पहिल्या षटकात प्रभसिमरनने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. त्याला सहा चेंडूमध्ये एकही धाव काढण्यात यश मिळाले नाही. दुसऱ्या षटकात वैभवने स्ट्राईक आपल्याकडे घेतली. त्याने स्ट्राईकवर येताच थेट चाैकार मारला. चाैकारसोबत त्याने आपले खाते उघडले. पण चौथ्या षटकाच्या चेंडूवर साहन अरायचिगेने कॅच घेतली आणि वैभव बाद झाला.

अशाप्रकारे इंडिया ‘अ’ संघाने 16 धावांवर आपली पहिली विकेट गमावली. वैभव खूप चांगला खेळ खेळेल, अशी अपेक्षा होती पण तसे घडले नाही. वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर प्रभसिमरनही जास्त काळ खेळपट्टीवर टीकू शकला नाही.  श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध भारत ‘अ’ संघाची सुरुवात खराब झाली. जशी अपेक्षा होती, तसा खेळ अजिबातच झाला नसल्याचे यावरून दिसतंय. वैभव सूर्यवंशी याच्याकडून मोठ्या अपेक्षा सर्वांनाच आहेत.

Follow Us