भारतीय वेगवान गोलंदाजाची निवृत्ती, भावनिक पोस्ट व्हायरल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

भारतीय वेगवान गोलंदाजाची निवृत्ती, भावनिक पोस्ट व्हायरल
भारतीय वेगवान गोलंदाजाची निवृत्ती, भावनिक पोस्ट व्हायरल
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 27, 2022 | 1:37 PM

ज्या खेळाडूंना टीम इंडियामधून (Team India) राष्ट्रीय सामने (national Match) खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचे चाहते देखील अधिक झाले आहेत. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत आयपीएलमध्ये (IPL) खेळताना आपली चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्यांना टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाही.

वेगवान गोलंदाज अनुरीत सिंगने याने राष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृ्त्ती जाहीर केली आहे. त्याने मागच्या कित्येक वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याचे सुध्दा सोशल मीडियावरती अधिक चाहते आहेत. त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना बडोदा, सिक्कीम चांगली कामगिरी केली आहे.

आयपीएलमध्ये अनुरीत सिंगने आत्तापर्यंत पंजाब किंग्ज, केकेआर आणि राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे, आयपीएलमध्ये आत्तापर्यंत त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

आत्तापर्यंत ज्यांनी मला खेळायचं कसं शिकवलं, त्याचबरोबर त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यामध्ये मुरळीविजय, संजय बांगर आणि अभय शर्मा यांचे आभार मानले आहेत. अनुरीत सिंगने ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.