World Cup आधी टीम इंडिया जंगल सफारीवर, ट्विटरवर ट्रोल

नवी दिल्‍ली : यावर्षीच्या विश्वचषकात (World Cup 2019) भारताला आपला पहिला सामना 5 जूनला खेळायचा आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. त्याआधीच्या मोकळ्या वेळात भारतीय संघाने जंगल सफारीला पसंती दिली. BCCI ने आपल्या ट्विटर हँडलवर खेळाडूंचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात भारतीय खेळाडू चांगलीच धमाल करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी पेंटबॉल युनिफॉर्म घातलेले होते. […]

World Cup आधी टीम इंडिया जंगल सफारीवर, ट्विटरवर ट्रोल
| Updated on: Jun 01, 2019 | 2:58 PM

नवी दिल्‍ली : यावर्षीच्या विश्वचषकात (World Cup 2019) भारताला आपला पहिला सामना 5 जूनला खेळायचा आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. त्याआधीच्या मोकळ्या वेळात भारतीय संघाने जंगल सफारीला पसंती दिली. BCCI ने आपल्या ट्विटर हँडलवर खेळाडूंचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात भारतीय खेळाडू चांगलीच धमाल करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी पेंटबॉल युनिफॉर्म घातलेले होते.

बीसीसीआयने खेळाडूंचे जंगलातील फोटो टाकल्यानंतर चाहत्यांना ते आवडलेले दिसत नाही. अनेक चाहत्यांनी भारतीय संघ तेथे जंगल सफारी करायला नाही, तर वर्ल्‍ड कप खेळायला गेल्याची आठवण करुन दिली. तसेच भारतीय संघाने विश्वचषकासाठी सराव करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

काहींनी तर तुम्ही सहलीला गेले नसून वर्ल्‍ड कप खेळायला गेल्याचेही म्हटले. एका चाहत्याने तर सर्व करा पण पाकिस्तानसोबत हरु नका, असेच सांगून टाकले.

बीसीसीआयचे ट्विट

सर्वांनाच भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता

दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यानंतर भारताचा सामना 9 जूनला ऑस्ट्रेलियाच्या विश्वकप विजेत्या संघाशी होईल. 13 जूनला भारत ट्रेंट ब्रिज मैदानावर न्युझीलंडच्या संघाविरोधात खेळेल. या सर्वात भारतीय चाहते मात्र भारत आणि पाकिस्तानमधील सामना पाहण्यासाठी आतुर आहेत. हा सामना 15 जूनला मॅनचेस्टरमधील ओल्ड ट्रेफर्ड येथे होईल. यानंतर 22 जूनला अफगानिस्तान आणि भारताचा सामना होईल.

27 जूनला भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या संघाला भिडेल. यजमान इंग्लंडच्या संघासोबत भारताचा सामना 30 जूनला एजबेस्टनमध्ये होईल. याच मैदानावर 2 जुलैला भारत बांग्लादेशविरुद्ध खेळेल. भारताचा शेवटचा सामना 6 जुलैला श्रीलंकेविरुद्ध होईल.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), विजय शंकर, रविंद्र जडेजा.