
IPL च ऑक्शन कालच संपलं. पण त्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तानचं नुकसान हे आयपीएलमध्ये विक्री झालेल्या खेळाडूंशी संबंधित आहे. जे पाकिस्तान सुपर लीग PSL टीमचा भाग होते. हे खेळाडू आता PSL च्या पुढच्या सीजनमध्ये खेळताना दिसणार नाहीत. असे 11 खेळाडू आहे, ज्यातल्या 10 खेळाडूंची काल आयपीएल ऑक्शनमध्ये विक्री झाली. एका प्लेयरला ऑक्शन आधीच रिटेन करण्यात आलं होतं. या सर्व 11 खेळाडूंना विकत घेण्यासाठी आयपीएल फ्रेंचायजींनी 27.3 कोटी म्हणजे जवळपास 28 कोटी रुपये खर्च केले.
त्या खेळाडूंच्या लिस्टवर नजर मारुया. जे PSL चा भाग होते. पण IPL मध्ये खेळताना दिसतील. या खेळाडूंमध्ये फिन एलेन, जेसन होल्डर, टिम सायफर्ट, मॅथ्यू शॉर्ट, अकील होसेन, काइल जॅमीसन, ल्यूक वुड, एडम मिल्न, जॉर्डन कॉक्स, बेन ड्वारशुइस आणि मिचेल ओवन या खेळाडूंची नाव आहेत. यात मिचेल ओवनला 3 कोटी रुपयात पंजाब किंग्सने रिटेन केलं. बाकी सर्व खेळाडू IPL 2026 च्या ऑक्शनमध्ये विकले गेले. हे सर्व खेळाडू पुढच्या सीजनमध्ये PSL कडून खेळताना दिसणार नाहीत.
कुठल्या खेळाडूला किती कोटीला विकत घेतलं?
पाकिस्तान सुपर लीगमध्ये फिन एलेन क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळायचा. पण आता IPL 2026 मध्ये तो KKR कडून खेळताना दिसेल. KKR ने त्याला 2 कोटी रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं. PSL मध्ये इस्लामाबाद यूनायटेडचा भाग राहिलेला जेसन होल्डर IPL 2026 मध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळणार आहे. GT ने त्याला 7 कोटी रुपयात विकत घेतलं. PSL मध्ये कराची किंग्सचा भाग राहिलेला टिम सायफर्ट सुद्धा IPL 2026 मध्ये खेळेल. त्याला KKR ने 1.50 कोटी रुपयात विकत घेतलय.
पाकिस्तानला झटका
मॅथ्यू शॉर्टला CSK ने 1.5 कोटी रुपयात विकत घेतलं. म्हणजे तो IPL 2026 मध्ये खेळणार. PSL मध्ये मॅथ्यू शॉर्ट इस्लामाबाद यूनायटेडचा भाग आहे. PSL मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणारा अकीला होसेन सुद्धा IPL 2026 मध्ये खेळताना दिसेल. CSK ने त्याला 2 कोटी रुपयात विकत घेतलय. PSL मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणारा काइल जॅमीसनला 2 कोटी रुपयात दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलय. म्हणजे तो सुद्धा IPL 2026 मध्ये खेळणार. ल्यूक वुड 75 लाख रुपयात गुजरात टायटन्सचा भाग बनला. हा प्लेयर सुद्धा PSL मध्ये पेशावर जाल्मीला सोडून IPL मध्ये खेळणार.