Rohit Sharma | “हिटमॅनचे आकडेच सर्व काही सांगतात”, रोहितला कर्णधार करण्याच्या मागणीवरुन नासिर हुसैनची प्रतिक्रिया

| Updated on: Nov 15, 2020 | 4:59 PM

विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला कर्णधार करण्यात यावं, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे.

Rohit Sharma | हिटमॅनचे आकडेच सर्व काही सांगतात, रोहितला कर्णधार करण्याच्या मागणीवरुन नासिर हुसैनची प्रतिक्रिया
Follow us on

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामना 10 नोव्हेबंरला खेळण्यात आला. हा अंतिम सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळण्यात आला. या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर 5 विकेट्सने मात केली. या विजयासह रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला 5 व्यांदा विजेतेपद मिळवून दिलं. तर गेल्या 13 वर्षांपासून विराट कोहलीला बंगळुरुला एकदाही विजेतपद मिळवून देता आलं नाही. विराटऐवजी रोहितला टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने (Nasser Hussain) याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. रोहितचे आकडेच सर्व काही सांगतात, अशी प्रतिक्रिया नासिर हुसेनने दिली आहे. ipl 2020 former england captain nasir hussain reaction to the demand to make hitman rohit sharma captain said

नासिर काय म्हणाला?

रोहित अगदी शांत डोक्याने संघाचे नेतृत्व करतो. रोहित योग्यवेळी योग्य निर्णय घेतो. रोहितचा मुंबईबरोबर फार चांगला काळ गेला आहे. विराटने टी 20 मधून कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा. तसेच रोहितने नव्याने ही जबाबदारी स्वीकारावी.कर्णधार म्हणून रोहितचे आकडेच सर्व काही सांगतात, असं नासिर म्हणाला.” स्काय स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमादरम्यान नासिरने याबाबत प्रतिक्रिया दिली.

हिटमॅनच्या फलंदाजीचं कौतुक

नासिरने रोहितच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. रोहित लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक लगावण्याची अफलातून कामगिरी केली आहे. टी 20 क्रिकेटमध्ये रोहित काही वेळा अपयशी ठरला. मात्र त्याने अंतिम सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, असंही नासिरने या वेळेस नमूद केलं.

“रोहितला कर्णधार करा”

टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही रोहितला कर्णधार करण्याची मागणी केली होती. रोहितला पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी दिली नाही, तर ते लज्जास्पद असेलच, आणि क्रिकेटचंही दुर्दैव असेल, असं गंभीर म्हणाला होता. तसेच जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचं नाही, तर भारतीय क्रिकेट संघाचं नुकसान असेल, असा इशाराही गंभीरने दिला होता.

दरम्यान सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

रोहित शर्माला कर्णधारपद न दिल्यास टीम इंडियाचं नुकसान, कोहलीवरील टीकेनंतर गंभीरचा नवा पर्याय

ipl 2020 former england captain nasir hussain reaction to the demand to make hitman rohit sharma captain said