IPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली?

| Updated on: Oct 19, 2020 | 6:15 PM

क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तोपर्यंत काहीही सांगता येत नाही. याच वाक्याची प्रचिती आयपीएलमध्ये काल खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यादरम्यान आली.

IPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली?
Follow us on

दुबई : क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तोपर्यंत काहीही सांगता येत नाही. याच वाक्याची प्रचिती आयपीएलमध्ये काल (रविवारी) खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यादरम्यान आली. सुरुवातीला मॅच टाय झाली. त्यानंतर पहिली सुपर ओव्हर बरोबरीत सुटली. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईवर विजय मिळवला. (IPL 2020 | Sachin Tendulkar suggested to remove boundary count rule from super over that costs Mumbai Indians)

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने 11 धावा केल्या. त्यामुळे पंजाबला 6 चेंडूत 12 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पंजाबच्या ख्रिस गेल आणि मयंक अग्रवाल या जोडीने 2 चेंडू राखत पूर्ण केलं. पंजाबने 15 धावा केल्या. या विजयासह पंजाबने मुंबईचा विजयीरथ रोखला. परंतु मुंबईचा पराभव आणि पंजाबचा विजय यामध्ये भारताच माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचं विशेष योगदान आहे. या सामन्यात सचिनमुळे मुंबई हरली असं कोणी म्हणालं तर ते पूर्णतः चुकीचं ठरणार नाही.

सर्वांना प्रश्न पडला असेल की, सचिनमुळे मुंबई कशी काय हरली? परंतु खूप कमी लोकांना माहीत आहे की, एक सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात यावी, अशी आयडिया सचिन तेंडुलकरच्याच डोक्यातून आलेली आहे.

2019 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना (इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना) टाय झाला होता. त्यानंतर खेळवण्यात आलेली सुपर ओव्हरदेखील टाय झाली. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी बाऊंड्री (चौकार आणि षटकार) मोजण्यात आल्या.

ज्या संघाने जास्त बाऊंड्री मारल्या तो संघ विजेता. या नियमानुसार इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत विश्वचषक स्वतःच्या नावे केला. परंतु हा नियम अनेकांना पटला नव्हता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलादेखील हा नियम पटला नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकरने (16 जूलै 2019 रोजी) सल्ला दिला की, “जर एक सुपर ओव्हर टाय झाली तर दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात यावी. जोवर सामन्याचा निकाल लागत नाही, तोवर सुपर ओव्हर खेळवण्यात यावी”.

या सामन्यात मुंबईच्या संघाने तब्बल 24 बाऊंड्री लगावल्या होत्या, तर पंजाबच्या संघाने 22 बाऊंड्री लगावल्या होत्या. त्यामुळे आयसीसीचा जुना नियम (जो संघ जास्त बाऊंड्री मारेल तो संघ विजेता) आजही कायम असता तर रविवारी झालेला सामना मुंबईचा संघ जिंकला असता.

संबंधित बातम्या

Super Over | मुंबई-पंजाबची सुपर ओव्हरही टाय, सुपर ओव्हरबद्दल रंजक गोष्टी, 47 वेळा पाठलाग करणाऱ्यांचा विजय

IPL 2020, MI vs KXIP, Super Over : ‘डबल धमाल’, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय

IPL 2020, SRH vs KKR : डेव्हिड वॉर्नरच्या आयपीएलमध्ये वेगवान 5 हजार धावा, विराट कोहलीला पछाडलं

IPL 2020 | ‘दुखापतग्रस्त’ दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी

(IPL 2020 | Sachin Tendulkar suggested to remove boundary count rule from super over that costs Mumbai Indians)