AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, MI vs KXIP, Super Over : ‘डबल धमाल’, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय

पंजाबने मुंबईचा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभव केला.

IPL 2020, MI vs KXIP, Super Over : 'डबल धमाल', दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय
| Updated on: Oct 19, 2020 | 1:36 AM
Share

दुबई : क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तो पर्यंत काहीही सांगता येत नाही. याच वाक्याची प्रचिती मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्जस इलेव्हन पंजाब या सामन्यादरम्यान आली. पहिली सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्यानंतर अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईवर 2 विकेटने दणदणीत विजय मिळवला.मुंबईकडून दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि किरन पोलार्डने बॅटिंग केली. तर पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने बोलिंग केली. पांड्या बाद झाल्यानंतर मैदानात सूर्यकुमार यादव मैदानात आला. यानंतर पाचव्या चेंडूवर पोलार्ड कॅचआऊट असल्याचं अंपायरने घोषित केलं. मात्र पोलार्डने डीआरएस घेतल्याने तो नाबाद ठरला. यासह मुंबईने 11 धावा केल्या. त्यामुळे पंजाबला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 12 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पंजाबच्या ख्रिस गेल आणि मयंक अग्रवाल या जोडीने 2 चेंडू राखत पूर्ण केलं. पंजाबने 15 धावा केल्या. या विजयासह पंजाबने मुंबईचा विजयीरथ रोखला.

पहिली सुपर ओव्हर

सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पहिली बोलिंग केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपर ओव्हर टाकली.

बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबला प्रथम बॅटिंग करताना 2 विकेट गमावून 5 धावाच करता आल्या.पंजाबकडून लोकेश राहुल-निकोलस पूरन ही जोडी मैदानात आली. मात्र निकोलस पूरन दुसऱ्याच चेंडूवर आऊट झाला. पूरननंतर दीपक हुड्डा मैदानात आला. हुड्डालाही विशेष काही करता आलं नाही. केएल राहुल शेवटच्या चेंडूवर बाद झाला. यामुळे मुंबईला विजयासाठी 6 धावांचे आव्हान मिळाले. मुंबईकडून बॅटिंगसाठी रोहित शर्मा-क्विंटन डी कॉक मैदानात आले. मात्र मोहम्मद शमीने टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांनाही 5 धावाच करता आल्या. त्यामुळे पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली.

याआधी मुंबईने  पंजाबला विजयासाठी 177 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पंजाबनेही 176 धावा केल्याने सामना बरोबरीत सुटला. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार लोकेश राहूलने अर्धशतकी खेळी केली. त्याने 51 चेंडूत 3 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. तर राहुल व्यतिरिक्त ख्रिस गेल आणि निकोलस पूरन या दोघांनी प्रत्येकी 24 धावा केल्या. तसेच दीपक हुड्डा आणि ख्रिस जॉर्डनने अखेरपर्यंत पंजाबला सामन्यात कायम ठेवलं. हुड्डाने नाबाद 23 धावा केल्या. पंजाबला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता होती. मात्र पंजाबला 1 धावच करता आली. दुसरी धाव घेताना ख्रिस जॉर्डन रनआऊट झाला. यासोबतच सामना बरोबरीत सुटला.

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. किरन पोलार्ड-नॅथन कुल्टर नाईल जोडीने केलेली फटकेबाजी आणि क्विटंन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 176 धावा केल्या. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 53 धावांची झुंजार खेळी केली. तर कृणाल पांड्याने 34 तर किरन पोलार्डने नाबाद 34 धावांची खेळी केली.

बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईची सावध सुरुवात राहिली. मात्र 23 धावांवर मुंबईला पहिला झटका बसला. हिटमॅन रोहित शर्मा 9 धावांवर आऊट झाला. सूर्यकुमार यादव आज अपयशी ठरला. सूर्यकुमारला आज भोपळाही फोडता आला नाही. यानंतर इशान किशन 7 रन्स करुन माघारी परतला. एकाबाजूला विकेट जात असताना क्विंटन डी कॉक एकाकी खिंड लढवत होता. इशाननंतर कृणाल पांड्या मैदानात आला. या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. कृणाल पांड्या 34 धावांवर बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला. हार्दिकने 9 धावा केल्या. हार्दिकनंतर क्विंटन डी कॉक बाद झाला. क्विंटनने 53 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 सिक्स आणि 3 फोर लगावले.

पोलार्ड-नाईलची फटकेबाजी

क्विंटन डी कॉक बाद झाला तेव्हा मुंबईची स्थिती 119-6 अशी होती. यानंतर नॅथन कुल्टर नाईल आणि किरन पोलार्ड या दोघांनी तुफानी फटकेबाजी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 57 धावांची तडाखेदार भागीदारी केली. पोलार्डने 12 चेंडूत 34 धावा केल्या. यात त्याने 4 सिक्स आणि 1 फोर लगावला. तर नॅथन कुल्टर नाईलने 12 चेंडूत 24 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 फोर लगावले. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंहने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर रवी बिश्नोई आणि ख्रिस जोर्डनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

एकाच दिवशी तब्बल 3 सुपर ओव्हर

मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्याचा निकाल लागण्यासाठी तब्बल 2 सुपर ओव्हर सामने खेळावे लागले. याआधी 18 ऑक्टोबरच्या डबल हेडरमधील पहिला सामना हैदराबाद विरुद्ध कोलकाता यांच्यात खेळण्यात आला. हा सामनाही बरोबरीत सुटला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्येच लागला. सुपर ओव्हरमध्ये कोलकाताने हैदराबादवर मात केली. त्यामुळे 2 सामन्यात तब्बल 3 सुपर ओव्हर खेळण्यात आल्या.

[svt-event title=”डबल धमाल” date=”19/10/2020,12:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गेलचा सिक्सर” date=”19/10/2020,12:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ट्रेन्ट बोल्ट बोलिंग करणार” date=”19/10/2020,12:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गेल-अग्रवाल मैदानात” date=”19/10/2020,12:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला विजयासाठी 12 धावांचे आव्हान” date=”19/10/2020,12:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मयंक अगरवालची भन्नाट फिल्डिंग” date=”19/10/2020,12:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हार्दिक पांड्या आऊट” date=”19/10/2020,12:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ख्रिस जॉर्डन सुपर ओव्हर टाकणार” date=”18/10/2020,11:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईकडून दुसऱ्या सुपर ओव्हरसाठी पोलार्ड-हार्दिक पांड्या मैदानात” date=”18/10/2020,11:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुपर ओव्हरही टाय, पुन्हा सुपर ओव्हर होणार” date=”18/10/2020,11:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला 1 चेंडूत 2 धावांची गरज” date=”18/10/2020,11:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मोहम्मद शमी सुपर ओव्हर टाकणार” date=”18/10/2020,11:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”क्विंटन डी कॉक-रोहित शर्मा मैदानात” date=”18/10/2020,11:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 6 धावांचे आव्हान” date=”18/10/2020,11:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निकोलस पूरन आऊट” date=”18/10/2020,11:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निकोलस पूरन-केएल राहुल मैदानात” date=”18/10/2020,11:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बुमराह सुपर ओव्हर टाकणार” date=”18/10/2020,11:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब पहिली बॅटिंग करणार” date=”18/10/2020,11:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब विरुद्ध मुंबई सामना टाय,” date=”18/10/2020,11:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता” date=”18/10/2020,11:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला विजयासाठी 9 धावांची आवश्यकता” date=”18/10/2020,11:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला पाचवा धक्का” date=”18/10/2020,11:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 52 धावांची आवश्यकता” date=”18/10/2020,10:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला चौथा झटका” date=”18/10/2020,10:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोकेश राहुलचे अर्धशतक” date=”18/10/2020,10:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला तिसरा धक्का” date=”18/10/2020,10:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला मोठा धक्का” date=”18/10/2020,10:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,10:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 5 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,9:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबला पहिला धक्का” date=”18/10/2020,9:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाब 2 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,9:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात” date=”18/10/2020,9:31PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला विजयासाठी 177 धावांचे आव्हान” date=”18/10/2020,9:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 18 ओव्हरनंतर” date=”18/10/2020,9:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला सहावा धक्का” date=”18/10/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचा अर्ध संघ तंबूत” date=”18/10/2020,8:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”क्विंटन डी कॉकचे अर्धशतक” date=”18/10/2020,8:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला चौथा धक्का” date=”18/10/2020,8:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर मुंबई” date=”18/10/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला तिसरा दणका” date=”18/10/2020,7:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला दुसरा मोठा धक्का” date=”18/10/2020,7:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हिटमॅन रोहित आऊट” date=”18/10/2020,7:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई प्लेइंग इलेव्हन” date=”18/10/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंजाबचे अंतिम 11 खेळाडू” date=”18/10/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईने टॉस जिंकला” date=”18/10/2020,7:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

यंदाच्या मोसमात याआधी 1 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात मुंबईने पंजाबचा 48 धावांनी पराभव केला होता. मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी केली आहे. मुंबईने या मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यापैकी 6 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई 12 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाबने खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 6 सामन्यात पराभव झाला आहे. तर केवळ 2 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. पंजाब पॉइंट्सटेबलमध्ये 4 गुणांसह आठव्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये मुंबई आणि पंजाब आतापर्यंत एकूण 25 वेळा आमनेसामने आले आहेत. या 25 पैकी 14 सामन्यात मुंबईने पंजाबवर विजय मिळवला आहे. तर पंजाबनेही 11 सामन्यात मुंबईला पराभवाची धूळ चारळी आहे.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

किंग्जस इलेव्हन पंजाब : लोकेश राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, निकोलस पूरन, ग्लॅन मॅक्सवेल, करुण नायर, सरफराज खान, कृष्णाप्पा गौतम, जेम्स निशाम, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरेल आणि रवि बिश्नोई

संबंधित बातम्या :

IPL 2020, KXIP vs MI : मुंबई इंडियन्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर 48 धावांनी मात

IPL 2020, SRH vs KKR Live : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने

IPL 2020 MI vs KXIP Live Score Update Today Cricket Match Mumbai Indians vs Kings Eleven Punjab Live Score

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.