IPL 2020, SRH vs KKR Super Over : सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय

हैदराबादविरुद्धच्या या विजयानंतर कोलकाता पॉइंट्सटेबलमध्ये 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे.

IPL 2020, SRH vs KKR Super Over : सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय

अबुधाबी : सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) दणदणीत विजय मिळवला आहे. हैदराबादने कोलकाताला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 3 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने सहज पूर्ण केलं. त्याआधी सुपर ओव्हर खेळायला आलेल्या हैदराबादला लॉकी फर्गयुसनने भेदक माऱ्याच्या जोरावर 2 विकेट घेत 2 धावांवरच रोखले.

त्याआधी हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती. मैदानात असलेल्या डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजी करत हैदराबादला सामन्यात कायम ठेवलं. अशा प्रकारे हैदराबादला शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. पण आंद्रे रसेलने टाकलेल्या अचूक चेंडूमुळे हैदराबादला 1 धावच काढता आली. त्यामुळे सामना 163 धावांवर बरोबरीत सुटला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक नाबाद 47 धावांची खेळी केली. जॉनी बेयरस्टोने 36 धावा केल्या. कोलकाताकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 विकेटस् घेतल्या.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या हैदाराबादची चांगली सुरुवात राहिली. पहिल्या विकेटसाठी जॉनी बेयरस्टो आणि केन विलियम्सनने 57 धावांची भागीदारी केली. केन 29 धावांवर बाद झाला. यानंतर हैदराबादाने 70 धावांवर दुसरी आणि तिसरी विकेट गमावली. प्रियम गर्ग 4 तर जॉनी बेयरस्टो 36 धावांवर बाद झाला. यानंतर हैदराबादने ठराविक अंतराने विकेट गमावले. मनिष पांडेने 6 धावा केल्या. विजय शंकर 7 रन्सवर आऊट झाला. यानंतर अब्दुल समदच्या सोबतीने वॉर्नरने 37 धावांची भागीदारी केली. अब्दुल समद 23 धावांवर बाद झाला.

हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांची आवश्यकता होती. वॉर्नरने शेवटच्या चेंडूपर्यंत हैदराबादचे आव्हान कायम ठेवलं. मात्र शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता होती. पण हैदराबादला 1 धावच काढता आली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. कोलकाताकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्थी या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेत फर्ग्युसनला चांगली साथ दिली.

त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 163 धावा केल्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलचा अपवाद वगळता सर्व फलंदाजांनी चांगली खेळी केली. कोलकाताकडून सलामीवीर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 23 धावांची खेळी केली. तर नितीश राणाने 29 धावा केल्या.

आंद्रे रसेलने निराशा केली. त्याने 9 धावा केल्या. यामुळे कोलकाताची 105-4 अशी स्थिती झाली. यानंतर कर्णधार इयोन मॉर्गन आणि दिनेश कार्तिकने कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. मोठा फटका मारण्याच्या नादात इयोन मॉर्गन शेवटच्या चेंडूवर आऊट झाला. त्याने 34 धावा केल्या. तर दिनेश कार्तिक 29 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून थंगारसु नटराजनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर बासिल थम्पी, विजय शंकर आणि रशीद खान या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Picture

कोलकाताचा सुपर विजय

18/10/2020,8:11PM
Picture

कोलकाताकडून इयोन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक मैदानात

18/10/2020,7:47PM
Picture

कोलकाताला विजयासाठी 3 धावांची आवश्यकता

18/10/2020,7:44PM
Picture

अब्दुल समद आऊट

18/10/2020,7:44PM
Picture

वॉर्नर क्लिन बोल्ड

18/10/2020,7:39PM
Picture

डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो मैदानात

18/10/2020,7:37PM
Picture

अटीतटीच्या सामन्यात सामना अनिर्णित, सुपर ओव्हर होणार

18/10/2020,7:33PM
Picture

हैदराबादला 1 चेंडूत 2 धावा

18/10/2020,7:32PM
Picture

हैदराबादला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता

18/10/2020,7:26PM
Picture

हैदराबादला सहावा धक्का

18/10/2020,7:25PM
Picture

सामना रंगतदार स्थितीत

18/10/2020,7:15PM
Picture

विजय शंकर आऊट

Picture

हैदराबादला 5 ओव्हरमध्ये 55 धावांची आवश्यकता

18/10/2020,6:58PM

18/10/2020,6:57PM
Picture

हैदराबाद 14 ओव्हरनंतर

18/10/2020,6:48PM
Picture

मनिष पांडे क्लिन बोल्ड

18/10/2020,6:36PM
Picture

हैदराबाद 11 ओव्हरनंतर

18/10/2020,6:34PM
Picture

हैदराबादला तिसरा झटका

18/10/2020,6:26PM
Picture

हैदराबादला दुसरा झटका

18/10/2020,6:22PM
Picture

हैदराबादला पहिला झटका

18/10/2020,6:11PM
Picture

हैदराबादची सावध सुरुवात

18/10/2020,5:50PM
Picture

हैदराबाद 2 ओव्हरनंतर

18/10/2020,5:46PM
Picture

हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात

18/10/2020,5:37PM
Picture

हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हान

18/10/2020,5:26PM
Picture

कोलकाताला चौथा झटका

18/10/2020,4:50PM
Picture

कोलकाताला तिसरा झटका

18/10/2020,4:36PM
Picture

कोलकाताला दुसरा झटका

18/10/2020,4:32PM
Picture

कोलकाताचा 9 ओव्हरनंतर स्कोअर

18/10/2020,4:21PM
Picture

कोलकाता 7 ओव्हरनंतर

18/10/2020,4:07PM
Picture

कोलकाता पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर

18/10/2020,4:03PM
Picture

कोलकाताला पहिला धक्का

18/10/2020,4:02PM
Picture

कोलकाता 5 ओव्हरनंतर

18/10/2020,3:55PM
Picture

कोलकाताची चांगली सुरुवात

18/10/2020,3:51PM
Picture

कोलकाता 2 ओव्हरनंतर

18/10/2020,3:40PM
Picture

कोलकाता 1 ओव्हरनंतर

18/10/2020,3:39PM
Picture

कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात

हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे.

18/10/2020,3:38PM
Picture

दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू

18/10/2020,3:38PM
Picture

असा आहे कोलकाताचा संघ

18/10/2020,3:37PM
Picture

हैदराबाद प्लेइंग इलेव्हन

18/10/2020,3:37PM
Picture

हैदराबादने टॉस जिंकला

18/10/2020,3:36PM

कोलकाताने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. या 8 पैकी 4 सामन्यात कोलकाताचा विजय झाला आहे. तर 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलकाता 8 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादनेही खेळलेल्या 8 सामन्यातून 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये 6 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. आजचा हा सामना प्लेऑफ फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून प्लेऑफ शर्यतीतलं आव्हान कायम ठेवण्याचं प्रय्तन दोन्ही संघांचं असेल.

हैदराबादवर कोलकाता वरचढ

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत हैदराबाद आणि कोलकाता एकूण 18 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 18 पैकी 11 सामन्यात कोलकाताने हैदराबादवर विजय मिळवला आहे. तर हैदराबादचा 7 सामन्यात यश आलं आहे. यंदाच्या मोसमात 26 सप्टेंबरला हैदराबाद विरुद्ध कोलकाता यांच्यात सामन्यात खेळण्यात आला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादवर 7 विकेटने विजय मिळवला होता.

कोलकाता नाइट राइडर्स : इओन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, शुभमन गिल, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, सुनील नारायण, निखिल नाईक आणि टॉम बेंटन.

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.

संबंधित बातम्या :

IPL 2020, KKR vs SRH : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात

IPL 2020, DC vs CSK : कगिसो रबाडाचे अनोखे अर्धशतक, लसिथ मलिंगा-सुनील नारायणचा रेकॉर्ड ब्रेक

IPL 2020 SRH vs KKR Live Score Update Today Cricket Match Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Score

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *