IPL 2020, DC vs CSK : कगिसो रबाडाचे अनोखे अर्धशतक, लसिथ मलिंगा-सुनील नारायणचा रेकॉर्ड ब्रेक

कगिसो रबाडा आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करत आहे.

IPL 2020, DC vs CSK : कगिसो रबाडाचे अनोखे अर्धशतक, लसिथ मलिंगा-सुनील नारायणचा रेकॉर्ड ब्रेक

शारजा : शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) धमाकेदार शतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. शिखर धवनने नाबाद 101 धावांची विजयी खेळी केली. या विजयासह दिल्लीने पॉइंट्सटेबलमध्ये ‘शिखर’ गाठलं. या सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) चेन्नईविरुद्ध 4 ओव्हर टाकल्या. यामध्ये त्याने 33 धावा देत 1 विकेट घेतली. यासह रबाडाने विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. तसेच रबाडाने यासह अनुभवी गोलंदाजांना मागं टाकलं आहे. IPL 2020 Delhi Capitals fast bowler Kagiso Rabada completed 50 fastest wickets in the IPL

काय आहे विक्रम?

चेन्नईने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईची निराशाजनक सुरुवात झाली. यानंतर चेन्नईचा सलामीवीर फॅफ डु प्लेसिने शेन वॉटसनच्या मदतीने चेन्नईचा डाव सावरला. यादरम्यान फॅफने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दमदार खेळी करत असलेल्या फॅफला कगिसोने 15 व्या ओव्हरमध्ये आऊट केलं. यासह फॅफची विकेट कगिसोच्या आयपीएल कारकिर्दीतील 50 वी विकेट ठरली. यासह कगिसोने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 50 विकेट घेण्याचा रेकॉर्डही केला. कगिसोने 50 विकेट्स घेण्याची ही कामगिरी 27 सामन्यात पूर्ण केली. तसेच यासह कगिसोने लसिथ मलिंगा आणि सुनील नारायणला मागे टाकलं.

याआधी आयपीएलमध्ये सुनील नारायणने 32 सामन्यात तर लसिथ मलिंगाने 33 सामन्यात 50 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्यामुळे या दोघांना पछाडत कगिसोने अवघ्या 27 सामन्यात 50 विकेट्स घेत रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

कगिसोची दमदार कामगिरी

कगिसो यंदाच्या मोसमात दिल्लीसाठी सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. तो प्रत्येक सामन्यात किमान 1 विकेट तरी घेतोय. तसेच किफायतशीर बोलिंग करतोय. कगिसोने यंदाच्या मोसमात 9 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत.

प्लेऑफपासून एक पाऊल दूर

दिल्लीचा संघ प्लेऑफपासून एक पाऊल दूर आहे. चेन्नईविरुद्धचा विजय हा दिल्लीचा यंदाच्या मोसमातील 7 वा विजय ठरला. या 7 विजयासह दिल्लीचे एकूण 14 पॉइंट्स झाले आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी किमान 8 सामने जिंकावे लागतात. त्यामुळे पुढील सामना जिंकत प्लेऑफमध्ये धडक मारण्याचा दिल्लीचा प्रयत्न असणार आहे. दिल्ली आपला पुढील सामना 20 ऑक्टोबरला पंजाबविरुद्ध खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, DC vs CSK : धवनचे धमाकेदार शतक, चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, पॉइंट्सटेबलमध्ये दिल्लीने गाठलं ‘शिखर’

IPL 2020 Delhi Capitals fast bowler Kagiso Rabada completed 50 fastest wickets in the IPL

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *