IPL 2020, DC vs CSK : धवनचे धमाकेदार शतक, चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, पॉइंट्सटेबलमध्ये दिल्लीने गाठलं ‘शिखर’

IPL 2020, DC vs CSK : धवनचे धमाकेदार शतक, चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, पॉइंट्सटेबलमध्ये दिल्लीने गाठलं 'शिखर'

'गब्बर' शिखर धवनने आयपीएलमधील पहिलं वहिलं शतक झळकावलं.

sanjay patil

|

Oct 17, 2020 | 11:56 PM

शारजा : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 5 विकेटने दणदणीत विजय मिळवला. गब्बर शिखर धवन दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. शिखर धवनने (Shikhar Dhawan) आयपीएलमधलं आपलं पहिलंवहिलं शतकं झळकावलं. चेन्नईने दिल्लीला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 1 चेंडूआधी 5 विकेट गमावून पूर्ण केलं. दिल्लीने 185 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने नाबाद 101 धावा केल्या. तर अक्षर पटेलने निर्णायक क्षणी 5 चेंडूत 21 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची निराशाजनक सुरुवात राहिली. दिल्लीला पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर पहिला झटका लागला. पृथ्वी शॉ शून्यावर आऊट झाला. यानंतर दिल्लीला दुसरा धक्का 26 धावांवर लागला. अजिंक्य रहाणे 8 धावांवर बाद झाला. रहाणेनंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला. अय्यर-धवनने तिसऱ्या विकेटसाठी 68 धावा जोडल्या. ही जोडी फोडायला ड्वेन ब्राव्होला यश आलं. त्याने श्रेयसला 23 धावांवर बाद केलं.

एकाबाजूला विकेट जात असताना ‘गब्बर’ शिखर धवन मैदानात तंबू ठोकून उभा होता. अय्यरनंतर मार्कस स्टोइनिस मैदानात आला. धवन-मार्कस या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या. मार्क्स स्टोइनिस 24 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या अॅलेक्स कॅरीही बाद झाला. यादरम्यान गब्बरने आयपीएलमधील पहिलं शतकं पूर्ण केलं. अॅलेक्सनंतर अक्षर पटेल मैदानात आला. अक्षर पटेलने धमाकेदार खेळी केली. अक्षरने षटकार खेचत दिल्लीला विजय मिळवून दिला. शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. याखेळीत त्याने 14 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर अक्षर पटेलने 5 चेंडूत धमाकेदार नाबाद 21 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर सॅम करन, शार्दूल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या चेन्नईची खराब सुरुवात झाली. सॅम करन पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शेन वॉटसन आणि फॅफ डु प्लेसिसने 87 धावांची भागीदारी केली. यानंतर शेन वॉटसन 36 धावावंर बाद झाला. यानंतर अंबाती रायुडू मैदानात आला. रायुडूच्या मदतीने काही ओव्हर फॅफने चेन्नईचा धावफळक हलता ठेवला. यादरम्यान फॅफने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र 58 धावांवर फॅफ आऊट झाला. त्याने या खेळीत 2 सिक्स आणि 6 फोर लगावले. धोनीने आजही निराशा केली. धोनी 3 धावांवर बाद झाला.

यानंतर अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजाने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शेवटच्या 21 चेंडूत या जोडीने 50 धावांची भागीदारी केली. या दरम्यान रवींद्र जडेजाने फटकेबाजी केली. रवींद्र जडेजाने 13 चेंडूत नाबाद  33 धावांची खेळी केली. यात त्याने 4 सिक्स लगावले. चेन्नईने 4 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 179 धावा केल्या. चेन्नईकडून फॅफ डु प्लेसिसने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर अंबाती रायुडूने नाबाद 45 रन्सची खेळी केली. दिल्लीकडून एनरिच नोर्तजने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर खगिसो रबाडा आणि तुषार देशपांडे या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

[svt-event title=”दिल्लीचा शानदार विजय” date=”17/10/2020,11:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 6 चेंडूत 17 धावांची आवश्यकता” date=”17/10/2020,11:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिखर धवनचे शतक” date=”17/10/2020,11:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचा निम्मा संघ तंबूत” date=”17/10/2020,11:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 24 चेंडूत 41 धावांची आवश्यकता” date=”17/10/2020,10:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला चौथा दणका” date=”17/10/2020,10:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 51 धावांची आवश्यकता” date=”17/10/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला तिसरा झटका” date=”17/10/2020,10:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गब्बर अर्धशतक” date=”17/10/2020,10:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”8 ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोअर” date=”17/10/2020,10:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर दिल्ली” date=”17/10/2020,9:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा झटका” date=”17/10/2020,9:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दीपक चहरची विकेट मेडन” date=”17/10/2020,9:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला पहिला झटका” date=”17/10/2020,9:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या फलंदाजीला सुरुवात” date=”17/10/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 180 धावांचे आव्हान ” date=”17/10/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 19 ओव्हरनंतर” date=”17/10/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला चौथा धक्का” date=”17/10/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला तिसरा धक्का” date=”17/10/2020,8:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”14 ओव्हरनंतर चेन्नई” date=”17/10/2020,8:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला दुसरा धक्का” date=”17/10/2020,8:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”फॅफ डु प्लेसिसच अर्धशतक” date=”17/10/2020,8:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईचा 9 ओव्हरनंतर स्कोअर” date=”17/10/2020,8:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर” date=”17/10/2020,7:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सॅम करन शून्यावर बाद” date=”17/10/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू” date=”17/10/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे अंतिम 11 खेळाडू” date=”17/10/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईचे अंतिम 11 खेळाडू” date=”17/10/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईने टॉस जिंकला” date=”17/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी केली आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. यापैकी 6 सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे. तर केवळ 2 सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये 2 ऱ्या क्रमांकावर आहे. तर 3 वेळा जेतेपद पटकावलेल्या चेन्नईने यंदाच्या मोसमात निराशानजक कामगिरी केली आहे. चेन्नईने खेळलेल्या 8 सामन्यांपैकी फक्त 3 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर 5 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नई अंकतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे.

चेन्नई दिल्लीला वरचढ

आयपीएल स्पर्धेत दिल्ली आणि चेन्नई एकूण 22 सामन्यात समोरासमोर आले आहेत. या 22 सामन्यांपैकी 15 सामन्यात चेन्नईने दिल्लीवर मात केली आहे. तर दिल्लीला 7 सामने जिंकण्यास यश आले आहे. यंदाच्या मोसमात याआधी झालेल्या 25 सप्टेंबरच्या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर 44 धावांनी मात केली होती.

चेन्नई सुपर किंग्जस : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायुडू, फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, पीयूष चावला, इमरान ताहिर, मिचेल सेंटनर, जोश हेझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, खगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डेनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिच नॉर्तजे, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्क्स स्टोयनिस आणि ललित यादव.

संबंधित बातम्या :

CSK vs DC : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात

IPL 2020, RR vs RCB Live : राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे तगडे आव्हान

ipl 2020 dc vs csk live score update today cricket match delhi capitals vs chennai super kings live

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें