CSK vs DC : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात

दिल्लीकडून 64 धावा करणाऱ्या पृथ्वी शॉला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. | ( CSK vs DC Live Score Update )

CSK vs DC : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात

दुबई : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा (chennai super kings) आयपीएलच्या 13 व्या मोसमातील सलग दुसरा पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नईवर 44 धावांनी मात केली आहे. दिल्लीने चेन्नईला विजयासाठी 176 धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 131 धावाच करता आल्या. चेन्नईकडून फॅफ डु प्लेसिसने सर्वाधिक 43 धावा केल्या. दिल्लीकडून खगिसो रबाडाने 3 विकेट्स घेतल्या. ( CSK vs DC Live Score Update )

दिल्लीने दिलेल्या विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईने सावध सुरुवात केली. सलामीवीर मुरली विजय आणि शेन वॉटसनने सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 23 धावा जोडल्या. यानंतर शेन वॉटसन 14 धावा करुन बाद झाला. यानंतर मैदानात फॅफ डु प्लेसि आला. यानंतर चेन्नईची सहाव्या ओव्हरमध्ये दुसरी विकेट गेली. मुरली विजय 10 धावा करुन तंबूत परतला. नवख्या ऋतुराजने आजही निराशा केली. ऋतुराज 5 धावांवर रनआऊट झाला.

यानंतर मैदानात आलेल्या केदारने फॅफला चांगली साथ दिली. या दोघांनी चेन्नईचा घसरलेला डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 54 धावांची पार्टनरशीप केली. मात्र यानंतर केदार 26 धावांवर बाद झाला. एका बाजूला विकेट जात असताना फॅफ एकाकी झुंज देत होता. मात्र फॅफही 43 धावा करुन तंबूत परतला.

यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी 15 आणि 12 धावा केल्या. दिल्लीकडून खगिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर एनरिच नॉर्तजेने 2 विकेट घेत रबाडाला चांगली साथ दिली.

याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून दिल्लीला बॅटिंग करण्यास भाग पाडले. फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीची धमाकेदार सुरुवात झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि गब्बर शिखर धवनने दिल्लीला चांगली सुरुवात दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी तोडायला पियूष चावलाला यश आले. त्याने धवनला 35 धावांवर एलबीडब्लयू केले. यानंतर पृथ्वी शॉने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पृथ्वी बाद झाला. त्याने 64 धावा केल्या.

दोन्ही सलामीवर माघारी परतले. यानंतर ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. यानंतर श्रेय्यस अय्यर 26 धावांवर बाद झाला. पंत आणि स्टोईनिसने अनुक्रमे नाबाद 36 आणि 5 धावा केल्या. चेन्नईकडून पियूष चावलाने 2 तर सॅम करणने 1 विकेट घेतली. ( CSK vs DC Live Score Update )

Picture

चेन्नईचा सलग दुसरा पराभव

25/09/2020,11:07PM
Picture

चेन्नईला सातवा धक्का

25/09/2020,11:04PM
Picture

चेन्नईला सहावा धक्का

25/09/2020,11:02PM
Picture

चेन्नई 19 ओव्हरनंतर

25/09/2020,10:59PM
Picture

चेन्नई 18 ओव्हरनंतर

25/09/2020,10:54PM
Picture

चेन्नईला पाचवा धक्का

25/09/2020,10:50PM
Picture

चेन्नईला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 65 धावांची गरज

25/09/2020,10:46PM
Picture

चेन्नईला चौथा झटका

25/09/2020,10:37PM
Picture

फॅफ-केदारमध्ये चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी

25/09/2020,10:34PM
Picture

चेन्नई 15ओव्हरनंतर

25/09/2020,10:33PM
Picture

फॅफ-जाधवने चेन्नईचा डाव सावरला

25/09/2020,10:28PM
Picture

चेन्नईची 13 ओव्हरनंतर धावसंख्या

25/09/2020,10:20PM
Picture

12 ओव्हरनंतर चेन्नई

25/09/2020,10:18PM
Picture

फॅफला जीवनदान

25/09/2020,10:15PM
Picture

चेन्नई 11 ओव्हरनंतर

25/09/2020,10:11PM
Picture

चेन्नईची 10 ओव्हरनंतर धावसंख्या

25/09/2020,10:08PM
Picture

चेन्नईला तिसरा झटका

25/09/2020,10:04PM
Picture

चेन्नईची 9 ओव्हरनंतर धावसंख्या

25/09/2020,10:00PM
Picture

8 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोअर

25/09/2020,9:57PM
Picture

चेन्नईची धावसंख्या

25/09/2020,9:54PM
Picture

चेन्नईला दुसरा दणका

25/09/2020,9:50PM
Picture

चेन्नई 5 ओव्हरनंतर

25/09/2020,9:45PM
Picture

चेन्नईला पहिला धक्का

25/09/2020,9:42PM
Picture

चेन्नईची 4 ओव्हरनंतर धावसंख्या

25/09/2020,9:38PM
Picture

चेन्नई 3 ओव्हरनंतर

25/09/2020,9:36PM
Picture

पृथ्वी शॉने वॉटसनचा कॅच सोडला

25/09/2020,9:33PM
Picture

चेन्नईची 2 ओव्हरनंतर धावसंख्या

25/09/2020,9:31PM
Picture

चेन्नईची धावसंख्या

25/09/2020,9:26PM
Picture

चेन्नईच्या डावाला सुरुवात

सलामीवीर शेन वॉटसन आणि मुरली विजय मैदानात

25/09/2020,9:23PM
Picture

दिल्लीच्या 20 षटकात 175 धावा

25/09/2020,9:08PM
Picture

दिल्लीला तिसरा धक्का

25/09/2020,9:03PM
Picture

दिल्ली 18 ओव्हरनंतर

25/09/2020,8:59PM
Picture

पंत-अय्यरची नाबाद अर्धशतकी भागीदारी

25/09/2020,8:58PM
Picture

दिल्लीची धावसंख्या

25/09/2020,8:52PM
Picture

दिल्लीची 16 ओव्हरनंतर धावसंख्या

25/09/2020,8:47PM
Picture

15 ओव्हरनंतर दिल्लीची धावसंख्या

25/09/2020,8:40PM
Picture

दिल्ली 14 ओव्हरनंतर

25/09/2020,8:36PM
Picture

13 ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोअर

25/09/2020,8:33PM
Picture

दिल्लीची दुसरी विकेट

25/09/2020,8:28PM
Picture

दिल्लीला पहिला दणका

25/09/2020,8:24PM
Picture

दिल्ली 10 ओव्हरनंतर

25/09/2020,8:23PM
Picture

पृथ्वीचे अर्धशतक पूर्ण

25/09/2020,8:18PM
Picture

दिल्ली 9 ओव्हरनंतर

25/09/2020,8:17PM
Picture

पृथ्वी-शिखरची फटकेबाजी

25/09/2020,8:08PM
Picture

पहिल्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी

25/09/2020,8:04PM
Picture

दिल्ली 7 ओव्हरनंतर

25/09/2020,8:02PM
Picture

पावरप्लेमध्ये दिल्लीच्या 36 धावा

25/09/2020,7:57PM
Picture

5 ओव्हरनंतर दिल्लीच्या धावा

25/09/2020,7:53PM
Picture

दिल्लीची चांगली सुरुवात

25/09/2020,7:51PM
Picture

दिल्लीची 3 ओव्हरनंतर धावसंख्या

25/09/2020,7:45PM
Picture

दिल्ली 2 ओव्हरनंतर

25/09/2020,7:40PM
Picture

पहिल्या ओव्हरनंतर दिल्लीची धावसंख्या

25/09/2020,7:35PM
Picture

चेन्नई आणि दिल्लीचे अंतिम 11 खेळाडू

25/09/2020,7:23PM
Picture

दिल्लीचे अंतिम 11 खेळाडू

25/09/2020,7:19PM
Picture

चेन्नईचे 11 शिलेदार

25/09/2020,7:14PM
Picture

चेन्नईने नाणेफेक जिंकली

25/09/2020,7:03PM
Picture

चेन्नई दिल्लीवर वरचढ

चेन्नई विरुद्ध दिल्ली यांच्यात आतापर्यंत एकूण 21 सामने खेळले गेले आहेत. या 21 सामन्यांपैकी 15 सामन्यात चेन्नईने दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर 6 सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे.

25/09/2020,5:32PM

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *