IPL 2021 : आयपीएलमध्ये हे 5 बॅट्समन धावांचा पाऊस पाडू शकतात!

| Updated on: Apr 01, 2021 | 10:50 AM

आयपीएलची स्पर्धा तशी धावांची लयलूट करणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कोणते 5 बॅट्समन धावांचा पाऊस पाडू शकतात, यावर आपण नजर टाकूया... (IPL 2021 5 Indian Batsman may Be top Runs Score)

IPL 2021 : आयपीएलमध्ये हे 5 बॅट्समन धावांचा पाऊस पाडू शकतात!
Virat Kohli And MS Dhoni
Follow us on

मुंबईआयपीएलचा (IPL 2021) रणसंग्राम सुरु होण्यास अगदी काही दिवस शिल्लक राहिलेत. 9 एप्रिलला आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात होणार आहे. आयपीएलची स्पर्धा तशी धावांची लयलूट करणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत अनेक बॅट्समन उत्तुंग रेकॉर्डस बनवत असतात. तसेच दुसरे बॅट्समन त्यांचा रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड्स प्रस्थापित करत असतात. यंदाच्या मोसमात भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. आयपीएलमध्ये कोणते 5 बॅट्समन धावांचा पाऊस पाडू शकतात, यावर आपण नजर टाकूया… (IPL 2021 5 Indian Batsman may Be top Runs Score)

विराट कोहली (Virat Kolhi)

क्रिकेट जगतातला विस्फोटक बॅट्समन म्हणून विराट कोहली ओळखला जातो. 2008 पासून तो सातत्याने आयपीएलमध्ये धावा करतोय. परंतु त्याच्या नेतृत्वाखालील बंगळुरुला आणखी एकदाही आयपीएलचं जेतेपद मिळवता आलं नाही. यावेळी पहिल्यांदाच बंगळुरुला जेतेपद मिळवून देण्यास विराट उत्सुक आहे. पाठीमागच्या आयपीएल मोसमात विराटने 15 मॅचमध्ये 42.36 ने 466 रन्स केले. ज्यामध्ये त्याने 3 अर्धशतक ठोकले.

एम एस धोनी (MS Dhoni)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या एम एस धोनीवर आता कोणताही दबाव नसेल. चेन्नईकडून पाठीमागच्या मोसमात खेळताना धोनीने 14 मॅचमध्ये 25 च्या सरासरीने 200 रन्स केले. यादरम्यान 47 हा त्याची सर्वोच्च धावसंख्या असेल. पाठीमागचा मोसम चेन्नईसाठी काही खास गेला नाही. यंदाचा हंगाम चेन्नईसाठी यादगार ठरविण्यासाठी धोनीची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

रिषभ पंत (Rishabh pant)

भारतीय संघाचा विकेट कीपर फलंदाज रिषभ पंतने मागील काही महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तारावर धमाकेदार कामगिरी केली आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांचं सगळं लक्ष त्याच्यावर असेल. त्यातच श्रेयस अय्यर जखमी झाल्याने दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा पंतच्या खांद्यावर असेल. पंतने मागील मोसमात 14 मॅचमध्ये 343 रन्स केले. ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता.

के एल राहुल (KL Rahul)

किंग्स इलेव्हन पंजाबला जेतेपदाचा करंडक मिळवून देण्यासाठी के एल राहुल प्रयत्नांची पराकष्ठा करेल. राहुलने पाठीमागील मोसमात 14 मॅचमध्ये 670 रन्स केले. ज्यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. केएलने आपल्या बॅटिंगच्या जोरावर मागील सिझनमध्ये ऑरेंज कॅप नावावर केली होती.

रोहित शर्मा (Rohit Sharma)

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलच्या 14 व्या मोसमात रन्सचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. पाठीमागच्या मोसमात मुंबईच्या खेळाडूंनी बदारदार खेळ करत पाचव्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. रोहितने 12 मॅचमध्ये 332 रन्स ठोकले होते. ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता. यावेळी जास्तीत जास्त रन्स करुन सहाव्यांदा आयपीएलचा करंडक जिंकण्याचा त्याचा मानस आहे.

(IPL 2021 5 Indian Batsman may Be top Runs Score)

हे ही वाचा :

रवी शास्त्री यांनी घेतली भगतसिंह कोश्यारी यांची भेट, चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय?

सेहवाग गंभीरला स्थान, पण सचिन -धोनीला नाही, या दिग्गज खेळाडूची IPL टीम पाहिलीत का?

युवा खेळाडू तयार, सिनियरच्या निवृत्तीचा काहीही फरक पडणार नाही; मोहम्मद शमीचं रोखठोक मत