IPL AUCTION 2021 | मलिंगा, स्टीव्ह स्मिथच्या जागी कोण? IPL लिलावाची तारीख जवळपास निश्चित

| Updated on: Jan 23, 2021 | 10:57 AM

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमासाठी लिलाव प्रक्रिया फेब्रुवारीत पार पडण्याची शक्यता आहे.

IPL AUCTION 2021 |  मलिंगा, स्टीव्ह स्मिथच्या जागी कोण? IPL लिलावाची तारीख जवळपास निश्चित
आयपीएल ट्रॉफी
Follow us on

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमाचे क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहे. अवघ्या काही महिन्यांवर ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. या मोसमाआधी सर्व फ्रंचायजीने रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. काही फ्रंचायजीने खेळाडूंची अदलाबदलही केली आहे. या मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया कधी होणार, याबाबत जोरदार चर्चा काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात सुरु होती. मात्र या चर्चेला आता जवळपास पूर्णविराम मिळालं आहे. बीसीसीआयने (BCCI) या लिलाव प्रक्रियेसाठीची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र 18 फेब्रुवारीला ही लिलावप्रक्रिया पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र हा कार्यक्रम कुठे पार पडणार, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. (ipl 2021 auction likely held in 18 february 2021)

ठिकाणाबाबत अनिश्चितता पण चेन्नईत होण्याची शक्यता

ही लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला पार पडू शकते. मात्र हा कार्यक्रम कुठे पार पडणार, हे अजून ठरलं नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या एक अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. बोली प्रक्रिया चेन्नईत होणार असल्याचीही चर्चा आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेपासून होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 5-9 फेब्रुवारी तर दुसरा सामना 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान खेळण्यात येणार आहे. या दोन्ही सामन्याचे आयोजन चेन्नईमध्ये खेळण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएल लिलाव प्रक्रिया चेन्नईत पार पडण्याची शक्यता आहे.

14 व्या मोसमाचं आयोजन कुठे?

बोली प्रक्रियेचं नियोजन कुठे करायचं यासह या 14 व्या मोसमाचं आयोजन कुठे करायचं, याबाबतचा निर्णयही बीसीसीआयला घ्यायचा आहे. 14 वा हंगाम भारतातच खेळवणार असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) काही महिन्यांपूर्वी दिली होती. कोरोना विषाणूमुळे 2020 मध्ये आयपीएलच्या 13 व्या पर्वाचं नियोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

IPL Retained and Released Players 2021 : लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले?

Suresh Raina | ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचा कमाईबाबत विक्रम, मानाच्या पंगतीत स्थान

RR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड

(ipl 2021 auction likely held in 18 february 2021)