IPL 2021 : “माही भाईच्या नेतृत्वात खेळणं हा माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण”

| Updated on: Mar 31, 2021 | 7:37 AM

मला खरंच खूप आनंद होतोय. याच्याशिवाय दुसरा आनंदाचा क्षण असू शकत नाही. यासाठी चेन्नईची फ्रेंचायझी, श्रीनिवासन तसंच माही भाईचे आभार, असं पुजारा म्हणाला. | CSK Cheteshwar Pujara

IPL 2021 : माही भाईच्या नेतृत्वात खेळणं हा माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण
Cheteshwar Pujara And MS Dhoni
Follow us on

मुंबईआयपीएलमध्ये (IPL 2021) पुनरागमन करताना मला खूप आनंद होतोय. चेन्नई सुपर किंग्स (Channai Super Kings) ही लीग दुनियातील बेस्ट लीग आहे. या संघाचा एक भाग आहे, याचा मला आनंद आहे. त्यातही माही भाईच्या (MS Dhoni) कुशल नेतृत्वाखाली खेळायला मिळणं हा माझ्यासाठी आनंदाचा आणि गर्वाचा क्षण असल्याच्या भावना भारतीय कसोटी संघाची भिंत संयमी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) व्यक्त केल्या आहेत. क्रिकबजशी तो बोलत होता. (IPL 2021 Cheteshwar Pujara Says Thank You Channai Super Kings And MS Dhoni)

चेन्नई सुपर किंग्समध्ये माझं पुनरागमन होतंय. मला खरंच खूप आनंद होतोय. याच्याशिवाय दुसरा आनंदाचा क्षण असू शकत नाही. यासाठी चेन्नईची फ्रेंचायझी, श्रीनिवासन तसंच माही भाईचे आभार, असं पुजारा म्हणाला.

फ्रेंचायझीकडून पुजाराची स्तुती

चेतेश्वर पुजारावर ज्या वेळी चेन्नईने बोली लावली तसंच त्याला खरेदी केलं त्यावेळी बाकी संघांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. नंतर बोलताना एन श्रीनिवासन यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने ज्या प्रकारे आपलं टेंपरामेंट दाखवलं, त्यावरुन तो आयपीएच्या संघात अनसोल्ड राहू नये, अशा माझ्या भावना होत्या.

काय म्हणाला चेतेश्वर पुजारा

श्रीनिवासन यांच्या कौतुकावर बोलताना पुजाराने त्यांचे आभार मानले. हे खरोखर त्यांचं मोठेपण आहे. मी अशा टीमचा भाग आहे जी टीम आंतरराष्ट्रीय कसोटीतील्या प्रदर्शनाचा आदर करते. मी नशीबवान आहे की माही भाईच्या नेतृत्वाखाली मी खेळणार आहे. माझं आंतरराष्ट्रीय पदार्पण माही भाई कर्णधार असतानाच झालं होतं आताही आयपीएलमधलं माझं पुनरागमन माही भाईच्याच नेतृत्वाखाली होतंय, यापेक्षा आनंददायी काय असू शकते, अशा भावना पुजाराने व्यक्त केल्या.

कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूविषयी एक मत तयार केलं जातं. छोट्या फॉरमॅटमध्ये त्याला फारशी संधी दिली जात नाही. अशात आपल्यातला खेळ दाखवण्याची कधी कधी संधीही मिळत नाही. आता माझ्या भावना आहेत की, आयपीएलच्या चेन्नई संघात मी अतिशय योग्य जागी आहे. मी संधी मिळताच योग्य प्रदर्शन करेल, असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.

षटकार मारण्याचा कसून सराव

चेतेश्वर पुजाराची ओळख एक चिवट खेळाडू म्हणून आहे. तो खेळपट्टीवर उभा राहण्यात त्याचा हात कुणाला धरु देणार नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आऊट करताना बोलर्स अगदी त्रासून जातात. अशातच छोट्या फॉरमॅट खेळताना कमी बॉलमध्ये जास्त धावा करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे पुनरागमन करताना षटकार आणि चौकारांसह पुनरामन करीत आपल्यातल्या क्लास दाखवण्यासाठी पुजारा षटकार मारण्याचा कसून सराव करत आहे.

(IPL 2021 Cheteshwar Pujara Says Thank You Channai Super Kings And MS Dhoni)

हे ही वाचा :

IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या, हे स्टार खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत!

IPL 2021 : रिषभ पंतच्या पाठीवर रिकी पॉटिंगचा हात, समर्थनार्थ ‘खास बात!’

रिषभ पंतला सर्वात मोठी लॉटरी, थेट कर्णधारपदी नियुक्ती