IPL 2021 | पंजाब विरुद्ध मुंबईचा दारुण पराभव, हिटमॅन रोहितच्या निर्णयावर सेहवाग संतापला, म्हणाला…

| Updated on: Apr 24, 2021 | 5:50 PM

पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 9 विकेट्सने धुव्वा उडवला. या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) संतापला.

IPL 2021 | पंजाब विरुद्ध मुंबईचा दारुण पराभव, हिटमॅन रोहितच्या निर्णयावर सेहवाग संतापला, म्हणाला...
पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 9 विकेट्सने धुव्वा उडवला. या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) संतापला.
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या 17 व्या (IPL 2021) सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने (Mumbai Indians) दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. कर्णधार (Rohit Sharma) रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) अपवाद वगळता मुंबईच्या इतर कोणत्याही फलंदाजाला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. या पराभवानंतर इशान किशनला टॉपमध्ये खेळवण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच टीम इंडियाचा माजी झंझावाती फलंदाज (virender sehwag) वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माने घेतलेल्या एका निर्णयावरुन संताप व्यक्त केला आहे. तसेच रोहितला खडेबोल सुनावले आहेत. (ipl 2021 pbks vs mi virender sehwag disappointed on mumbai indians captain rohit sharma)

सेहवाग काय म्हणाला?

“सूर्यकुमार चांगल्या पद्धतीने खेळतोय. त्याने मागील सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. सूर्यकुमारने पावर प्लेचा चांगला फायदा घेतला असता. सूर्यकुमार पावर प्लेमध्ये फटकेबाजीच्या प्रयत्नात लवकर बाद झाला असता. पण तो चांगला खेळतोय. तुम्ही सूर्यकुमारच्या ऐवजी दुसऱ्याच खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवताय. हा फलंदाज सातत्याने 3-4 सामन्यात अपयशी ठरतोय. तो धावा करेल अशी आशा आहे. पण यामुळे तुम्ही सूर्याकुमारचं खच्चीकरण करताय. सू्र्याने या मोसमात आतापर्यंत दबावात चांगली कामिगरी केली आहे”, असं सेहवाग म्हणाला. सेहवाग क्रिकबझच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस तो बोलत होता.

“सूर्याला पावर प्लेमध्ये पाठवायला हवं होतं”

“सूर्याला पावर प्लेदरम्यान खेळण्यासाठी पाठवायला हवं होतं. सूर्याने निश्चितच सामन्याचं चित्र पालटलं असंत. या सामन्यात एकच चांगली बाब घडली. ती म्हणजे रोहित आणि सूर्या 15-16 ओव्हरपर्यंत मैदानात खेळत होते. या दोघानंतर मागील फलंदाज फटकेबाजी करतील असं वाटलं होतं. मात्र असं झालं नाही. रोहितने तिसऱ्या क्रमांकावर इशान किशनला फलंदाजीसाठी पाठवलं. मात्र इशानने निराशा केली. इशानने 17 चेंडूत केवळ 6 धावा केल्या. तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या सूर्याने 27 चेंडूत 33 धावांची खेळी केली”, असंही सेहवागने यावेळेस स्पष्ट केलं.

मुंबईचा सलग दुसरा पराभव

मुंबईचा या मोसमातील सलग दुसरा पराभव ठरला. मुंबईला आधी दिल्लीने पराभूत केलं. त्यानंतर पंजाबने 9 विकेट्सने धूळ चारली. मुंबई ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्सटेबलमध्ये 4 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईचा आगामी सामन्यात 29 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध भिडणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021, RR vs KKR Head to Head | राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने, कोण मारणार बाजी?

RR vs KKR, IPL Match Prediction | कोलकाता विरुद्धच्या लढतीआधी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन टेन्शन फ्री, वाचा नक्की कारण काय?

(ipl 2021 pbks vs mi virender sehwag disappointed on mumbai indians captain rohit sharma)