IPL 2021 : कोरोनाचा हाहाकार, ऑस्ट्रेलियाची सावध पावलं, IPL संपल्यानंतर मायदेशी कसा जाणार?, मॅक्सवेलने सांगितला प्लॅन

| Updated on: May 01, 2021 | 1:31 PM

कोरोनाची दुसरी लाट जगभरात आलेली असताना ऑस्ट्रेलियाने अतिशय सावधपणे कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतणं अवघड होऊन बसलंय. (IPL 2021 RCB Glenn maxwell Australian Player Can return home After IPL)

IPL 2021 : कोरोनाचा हाहाकार, ऑस्ट्रेलियाची सावध पावलं, IPL संपल्यानंतर मायदेशी कसा जाणार?, मॅक्सवेलने सांगितला प्लॅन
ग्लेन मॅक्सवेल, आरसीबी
Follow us on

मुंबई : देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. वाढत्या संसर्गामुळे अनेक देशांनी भारतीय प्रवाशांवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाने देखील भारतीय प्रवासी विमानांवर बंदी घातली आहे. यानंतर भारतात आयपीएलसाठी (IPL 2021) थांबलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परत कसं जायचं याचं कोडं पडलंय. (IPL 2021 RCB Glenn maxwell Australian Player Can return home After IPL)

मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज ख्रिस लिनने आयपीएलनंतर खेळाडूंना परतण्यासाठी ऑस्ट्रेलियाने खास विमानांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. मात्र ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करणार नसल्याचं म्हटलं. यानंतर आता आरसीबीकडून खेळणार्‍या ग्लेन मॅक्सवेलने भारतातून मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियाला परतण्याचा प्लॅन सांगितला आहे.

काय म्हणाला ग्लेन मॅक्सवेल

“आम्ही मायदेशी परत जाण्याचा रस्ता शोधत आहोत. आम्हाला स्पर्धा संपल्यानंतर थोडा वेळ लागेल, मात्र परत कसं जायचं हे स्पष्ट असायला हवं. भारत आणि न्यूझीलंडच्या टीमला इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायचं आहे. परिस्थिती आणखी बिघडली तर आम्हाला इंग्लंडमध्ये वाट पाहावी लागेल. तसंच भारताच्या बाहेर विशेष विमानानं जावं लागेल. बहुतेक खेळाडू यावर सहमत असतील असा मला विश्वास आहे”, असं मॅक्सवेल म्हणाला.

मॅक्सवेलने द फाइनल वर्ड पॉडकास्टशी बोलताना सांगितले की, “आम्हाला फक्त मायदेशी जाण्यासाठी मार्ग शोधायचा आहे.” यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय आणि दोन्ही सरकार काम करू शकतात. आम्ही जर थोडं थांबलो तर असं घडू शकतं परंतु कशाही परिस्थितीत घरी परतण्याचा मार्ग स्पष्ट झाला पाहिजे.”

ऑस्ट्रेलियन खेळाडू संकटात

आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर सध्या मोठं संकट ओढावलं आहे. कोरोनाची दुसरी लाट जगभरात आलेली असताना ऑस्ट्रेलियाने अतिशय सावधपणे कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतणं अवघड होऊन बसलंय.

कोरोनाच्या या महाभयानक काळात भारतात आयपीएलचं 14 वं पर्व सुरु आहे. या पर्वात विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाचे 14 खेळाडू सद्यस्थितीत आयपीएल खेळत आहेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. त्याचसोबत आयपीएलच्या विविध फ्रेंचायजीमधला ऑस्ट्रेलियन कोचिंग तसंच सपोर्ट स्टाफ, टीव्ही कॉमेंटेटर यांचाही समावेश आहे. यामध्ये दिग्गज माजी खेळाडू रिकी पाँटिंग, ब्रेट ली, मॅथ्यू हेडन या महत्त्वाचा क्रिकेटर्सचा समावेश आहे.

(IPL 2021 RCB Glenn maxwell Australian Player Can return home After IPL)

हे ही वाचा :

IPL 2021 : आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!

IPL 2021 : ‘शाब्बास रं वाघा’, बंगळुरुचं कंबरडं मोडणाऱ्या हरप्रीतच्या पाठीवर विराटची कौतुकाची थाप!