IPL 2024 : ‘धोनी रिव्ह्यू सिस्टिम’ पुन्हा हिट, वाईड बॉलही नजरेतून सुटला नाही, अंपायरही चकित

डीआरएस घेण्यात धोनीचा हात धरू कोणीच शकत नाही. शनिवारी झालेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं. धोनीने एका वाईड बॉलचा रिव्ह्यू घेतला, ज्यामध्ये तो यशस्वी ठरला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने 9 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

IPL 2024 : 'धोनी रिव्ह्यू सिस्टिम' पुन्हा हिट, वाईड बॉलही नजरेतून सुटला नाही, अंपायरही चकित
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 8:21 AM

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात शनिवारी, लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा आठ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात लखनौच्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीचीच जास्त चर्चा झाली. धोनीने तुफानी फलंदाजी करत या सामन्यात 9 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 28 धावा केल्या. या काळात धोनीचा स्ट्राईक रेट 311.11 होता.

या सामन्यात आपल्या झंझावाती खेळीदरम्यान धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केले की डीआरएस घेण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. धोनीने त्याच्या बॅटिंग दरम्यान वाईड बॉलसाठी रिव्ह्यू घेतला, जो यशस्वी ठरला. ही संपूर्ण घटना सीएसकेचा डाव सुरू असताना 19व्या षटकात घडली. त्या षटकातील मोहसीन खानचा पहिला बॉल वाईड होता. यानंतर मोहसिनने पुढचा बॉलही ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकला, मात्र यावेळी मैदानावरील अंपायरने तो बॉल वाईड दिला नाही. त्यावेळी धोनीने लगेच रिव्ह्यूचा निर्णय घेतला. थर्ड अंपायर ब्रुस ऑक्सनफोर्ड यांनी रिप्ले पाहिल्यानंतर चेंडू रेषेच्या बाहेर असल्याचा निष्कर्ष काढला आणि तो बॉल वाईड दिला. बॉल रेषेच्या अगदी बाहेर होता आणि धोनी तेव्हा मधल्या स्ंटपचा गार्ड घेत होता, हे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे धोनीचा निर्णय बरोबर ठरला आणि धोनी रिव्ह्यू सिस्टीम पुन्हा हिट ठरली.

DRS ला धोनी रिव्ह्यू सिस्टीम का म्हटले जाते ?

डीआरएस चा मूळ अर्थ डिसिजन रिव्ह्यू सिस्टम (Decision Review System )असा आहे. पण धोनीच्या अद्वितीय कौशल्यामुळे आजकाल त्याला धोनी रिव्ह्यू सिस्टम (डीआरएस) असेही म्हणतात. डीआरएसचा वापर खेळाडू अंपायरच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी करतात. धोनीने डीआरएस घेतला आणि अंपायरचा निर्णय बदलला असे अनेक वेळा घडले आहे.

धोनीची तूफान फटकेबाजी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेव्हा देशाकडून खेळत होता, तेव्हाही त्याचे अनेक DRS निर्णय अगदी अचूक ठरले. विकेटकीपिंग करतानाही त्याने मागून बारीक लक्ष ठेवले. यामुळेच डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टीम म्हटले जाऊ लागले. धोनी डीआरएसमुळेही सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. धोनीने IPL 2024 मध्ये एकूण सात डावात 87 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट 255.88 आहे.

धोनीचा इंटरनॅशनल रेकॉर्ड

42 वर्षीय एमएस धोनीने 350 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या, ज्यात 10 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात 183 (नाबाद) धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. एकदिवसीय सामन्यात त्याने विकेटच्या मागे 444 विकेट घेतल्या. धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 6 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत.

Non Stop LIVE Update
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.