KKR vs DC : दिल्लीच्या पराभवासाठी जबाबदार कोण? कॅप्टन ऋषभ पंत काय म्हणाला?

Rishabh Pant Post Match Presentation KKR vs DC : दिल्ली कॅपिट्ल्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलच्या 17 व्या मोसमात दुसऱ्यांदा पराभूत व्हावं लागलं. दिल्लीच्या पराभवानंतर कॅप्टन ऋषभ पंतने काय म्हटलं?

KKR vs DC : दिल्लीच्या पराभवासाठी जबाबदार कोण? कॅप्टन ऋषभ पंत काय म्हणाला?
rishabh pant dc vs kkr ipl 2024,Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 11:44 PM

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सहावा विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 7 विकेट्सने धमाकेदार विजयाची नोंद केली. कोलकाताने 154 धावांचा पाठलाग 3 विकेट्स गमावून 16.3 ओव्हरमध्ये पूर्ण केला. कोलकाताने 21 बॉलआधी 157 धावा केल्या. कोलकातासाठी फिलीप सॉल्ट याने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर त्याआधी दिल्लीकडून आठव्या स्थानी आलेल्या कुलदीप यादव याने नाबाद 35 धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीला 153 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीची बॅटिंग फ्लॉप ठरली. दिल्लीच्या टॉप ऑर्डरने सपशेल निराशा केली. तर मिडल ऑर्डरमध्ये कॅप्टन ऋषभ पंतच्या 27 धावांचा अपवाद वगळता एकालाही खास काही करता आलं नाही. दिल्लीच्या या पराभवानंतर ऋषभ पंतने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

ऋषभ पंतने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणं योग्य असल्याचं म्हटलं. मात्र आम्ही 20-30 धावा करण्यात कमी पडल्याचं पंतने मान्य केलं. 180 धावा केल्या असत्या तर आमच्या गोलंदाजांना लढता आलं असतं, मात्र आम्ही तसं करण्यात अपयशी ठरल्याचं पंतने नमूद केलं. पंतने आणखी काय काय म्हटलं हे समजून घेऊयात.

ऋषभ पंत काय म्हणाला?

“पहिले बॅटिंग करणं हा चांगला पर्याय होता. आम्ही आदर्श बॅटिंग करु शकलो नाहीत. आपण आपल्या चुकांमधून शिकत असतो. प्रत्येक दिवस हा आपलाच नसतो”, असं पंतने म्हटलं. तसेच पंतच्या नेतृत्वाच दिल्लीने गेल्या 5 पैकी 4 सामने जिंकून जोरदार कमबॅक केलं होतं. याबाबतही पंतने प्रतिक्रिया दिली.

“आम्ही एक टीम म्हणून जशी वाटचाल केली ते छान होतं. मात्र हा टी 20 चा खेळ आहे. 180-210 च्या आसपास कोणतीही धावसंख्या चांगली ठरली असती. मात्र आम्ही आमच्या गोलंदाजांना डिफेंड करण्यासाठी कोलकाताला मोठं आव्हान देऊ शकलो नाहीत”, असं पंतने मान्य केलं.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स आणि खलील अहमद.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.