IPL 2024, RCB vs CSK : सामन्यात पाऊस पडला तर त्या दिवशी कसं असेल नियोजन, जाणून घ्या कसं काय होईल ते
आयपीएल 2024 स्पर्धेत क्रीडाप्रेमींचं लक्ष चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्याकडे लागून आहे. या सामन्यातून प्लेऑफसाठी एका संघाची निवड होणार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. चला जाणून घेऊयात या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर एकूण गणित कसं असेल

आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. या आधीच या स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. हा सामना रद्द झाला होता. त्यामुळे गुजरात टायटन्सचं प्लेऑफचं गणित फिस्कटलं होतं. तर कोलकात्याने अव्वल स्थानावरील मोहोर आणखी भक्कम केली होती. आता 18 मे रोजी होणाऱ्या सामन्यात पाऊस पडेल असा अंदाज आहे. हा सामना झालाच नाही तर चेन्नई सुपर किंग्सला थेट फायदा होईल आणि प्लेऑफमध्ये पोहोचेल. पण आरसीबीसाठी असं काही होणं वेदनादायी असणार आहे. कारण या सामन्यावरच आरसीबीचं गुण आणि नेट रनरेटचं गणित अवलंबून आहे. या सामन्यात पावसाने नाणेफेकीच्या आधीच हजेरी लावली तर पुढचं गणित कसं असेल ते समजून घेऊयात..
- आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 7 वाजता नाणेफेकीचा कौल होईल आणि 7.30 वाजता सामना सुरु होईल. या सामनी संपण्याची वेळ ही 11.50 मिनिटांची आहे.
- सामना खेळण्याची परिस्थिती असेल तर अतिरिक्त वेळ दिला जाईल. म्हणजेच सामना उशिराने सुरु झाल्याने एका तासांचा वेळ वाढवून दिला जाईल. पण त्यात 20 षटकं होतील का याचा अंदाज घेतला जाईल.
- 20 षटकांचा खेळ होणार नाही असं आढळल्यास षटकं कमी केली जातील. प्रत्येक 8 मिनिटांसाठी एक षटक वजा केलं जाईल. इतकंच काय तर टाइम आउट आणि इनिंग ब्रेकदेखील काढला जाईल.
- सामना सुरु झाल्यानंतर पाऊस पडल्यास डकवर्थ लुईस नियमानुसार षटकं कमी करून टार्गेट दिलं जाईल. या माध्यमातून सामना पूर्ण केला जाईल.
- पहिला डाव खेळणाऱ्यांनी 10 आणि दुसरा डाव खेळणाऱ्यांनी किमान 5 षटकं खेळली असावीत. तरच डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल निश्चित केला जाईल.
- आरसीबी-सीएसके सामन्याची पाच षटकांचा सामना आयोजित करण्यासाठीची कटऑफ वेळ की रात्री 10.56 मिनिटांची आहे. जर तसं झालं नाही तर सामना रद्द होईल. तसेच दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल.