KKR vs PBKS : केकेआरच्या गोलंदाजांचं आता खरं नाही, पंजाबकडून जोरदार धुलाई, नेटकऱ्यांना आठवला गंभीर, मीम्स व्हायरल

Gautam Gambhir KKR vs PBKS : कोलकाता नाईट रायडर्सला 261 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला आठवून मीम्स व्हायरल केले आहेत.

KKR vs PBKS : केकेआरच्या गोलंदाजांचं आता खरं नाही, पंजाबकडून जोरदार धुलाई, नेटकऱ्यांना आठवला गंभीर, मीम्स व्हायरल
kkr and gautam gambhir ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 12:28 AM

पंजाब किंग्स टीमने टी 20 क्रिकेटचा इतिहास बदलला आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमात पंजाब किंग्सने टी 20 क्रिकेटमधील विक्रमी धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 262 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 8 बॉलआधी 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबने 18.4 ओव्हरमध्ये 262 धावा केल्या. पंजाबने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. पंजाबचा हा टी 20 क्रिकेटमधील विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय ठरला. पंजाबच्या फलंदाजांनी या दरम्यान कोलकाताच्या गोलंदाजांना बॅटने जोरदार चोपला. यानंतर सोशल मीडियावर कोलकाताचा मेंटॉर गौतम गंभीर ट्रेंड झाला आहे. केकेआरचा 261 धावा करुनही पराभव झाल्यानंतर आता गंभीर गोलंदाजांसह टीममधील सर्वांची शाळा घेणार, अशा मीम्स व्हायरल झाल्या आहेत.

पंजाबच्या फलंदाजांनी या विजयी धावांचा पाठलाग करताना विस्फोटक बॅटिंग केली. प्रभसिमरन सिंह आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीने झंझावाती सुरुवात करुन दिली. प्रभसिमरनने टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत 20 बॉलमध्ये 54 धावांची खेळी केली. तर रायली रुसो याने 26 धावा जोडल्या. तर जॉनी बेयरस्टो याने शशांक सिंहच्या अफलातून सोबतीने पंजाबला विजयापर्यंत पोहचवलं. जॉनीने 48 बॉलमध्ये नाबाद 108 धावा केल्या. तर शशांक सिंह 28 बॉलमध्ये 68 धावांवर नाबाद परतला. तर केकेआरकडून सुनील नरेन यालाच एकमेव विकेट घेता आली.

नेटकऱ्यांच्या कल्पना शक्तीला पूर

केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर नावाप्रमाणे कायम डगआऊटमध्ये गंभीर होऊन बसलेला असतो. गंभीर आपल्या टीममधील खेळाडूंवर चांगल्या कामगिरीसाठी डाफरत असतो. तसेच विजयानंतर एकच जल्लोषही करतो. आता पंजाबने केकेआरच्या गोलंदाजाना धुतल्यानंतर गंभीर त्यांच्या खेळाडूंसह काय करेल, याची कल्पना करुन नेटकऱ्यांनी मीम्स पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

पराभवानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरणावर मीम्स

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रायली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.