KKR vs PBKS : सुनील नरेन-फिलीप सॉल्टचा तडाखा, पंजाबसमोर 262 धावांचा डोंगर

Kolkata Knight Riders vs Punjab Kings 1st Innings Highlights In Marathi : कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.

KKR vs PBKS : सुनील नरेन-फिलीप सॉल्टचा तडाखा, पंजाबसमोर 262 धावांचा डोंगर
Sunie Narine And Philip Salt,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 9:53 PM

कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 262 धावांचं आव्हान ठेवलं आहे. केकेआरच्या फलंदाजांनी विस्फोटक बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 261 धावा केल्या. कोलकाताला सुनील नरेन आणि फिलीप सॉल्ट या सलामी जोडीने अफलातून शतकी भागीदारी करत जोरदार सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर 3 फलंदाजांनी प्रत्येकी 20 पेक्षा अधिक धावांची खेळी करत केकेआरला 250 पार पोहचवण्यात मदत केली. केकेआरकडून फिलीप सॉल्ट आणि सुनील नरेन या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर पंजाबकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

शतकी सलामी भागीदारी

पंजाबने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी बोलावलं. केकेआरच्या सुनील नरेन आणि फिलीप सॉल्ट या सलामी जोडीने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. कोलकाताला झंझावाती सुरुवात करुन दिली. दोघांनी वादळी खेळी करत अर्धशतक झळकावलं. दोघांनही शतकं ठोकण्याची संधी होती. मात्र ते दोघांपैकी एकालाही जमलं नाही. राहुल चाहरने ही जोडी फोडली. केकेआरसाठी फिलीप आणि सुनीलने 138 धावांची भागीदारी केली. राहुलने नरीनला 71 धावांवर आऊट केलं. नरीनच्या या 32 बॉलच्या खेळीत 4 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता.

नरेन बाद झाल्यानंतर फिलीप सॉल्ट माघारी परतला. फिलीपने 37 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह 75 धावांची खेळी केली. ही सलामी जोडी अशाप्रकारे माघारी परतली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. कॅप्टन श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल या तिघांनी काही मोठे फटके मारले. रसेलने 12 बॉलमध्ये 2 सिक्स-2 फोरसह 24 धावा केल्या. श्रेयस अय्यर 10 बॉलमध्ये 1 फोर आणि 3 सिक्ससह 28 धावा करुन आऊट झाला. वेंकटेश अय्यरने 23 बॉलमध्ये 39 धावांचं योगदान दिलं. रिंकू सिंहने 5 धावा केल्या. तर रमनदीप सिंह 6 धावांवर बाद झाला. तर पंजाबकडून अर्शदीप व्यतिरिक्त कॅप्टन सॅम करन, हर्षल पटेल आणि राहुल चहल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

कोलकाताची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या

दरम्यान केकेआरची ही आयपीएलमधील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. केकेआरने आयपीएलमध्ये सर्वाधिक 272 धावा या दिल्ली विरुद्ध याच हंगामात केल्या होत्या. तर 2018 मध्ये पंजाब विरुद्ध 245 धावांपर्यंत मजल मारली होती. तर 2019 साली मुंबई इंडियन्स विरुद्ध 232 धावा केल्या होत्या.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रायली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.