IPL 2024, MI vs DC : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या या खेळाडूंकडे असेल सामन्याची चावी! जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेतील 43वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. असं असताना दोन्ही संघातील काही खेळाडूंकडे बारीक नजर असणार आहे. हे खेळाडू कोणत्याही क्षणी सामन्याची बाजू पालटण्याची ताकद ठेवतात.

IPL 2024, MI vs DC : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या या खेळाडूंकडे असेल सामन्याची चावी! जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 4:06 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 43व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. मागच्या सामन्यात जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते तेव्हा रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली सुरुवात करून दिली होती. रोहित शर्माने 49, तर इशान किशनने 42 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सनने 5 गडी गमवून 234 धावा केल्या होत्या. तर टिम डेविडने 21 चेंडूत 45 धावांची खेळी केली होती. तर रोमारियो शेफर्डने 10 चेंडूत 39 धावा ठोकल्या होत्या. दिल्लीनेही तोडीस तोड उत्तर दिलं होतं. पृथ्वी शॉ आणि ट्रिस्टन स्टब्सने अनुक्रमे 66 आणि 71 धावांची खेळी केली होती. मात्र विजयाशी गाठ होऊ शकली नाही. मुंबई इंडियन्सने 29 धावांनी दिल्ली कॅपिटल्सला मात दिली. सध्याच्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स वरचढ आहे. दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स 6 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या काही खेळाडूंचा फॉर्म पाहता या सामन्यात काही खेळाडूंकडे सामना फिरवण्याची ताकद आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून 5, तर मुंबई इंडियन्सकडून 6 खेळाडू आहेत. दिल्लीकडून ऋषभ पंत, जॅक फ्रेझऱ-मॅकगुर्क, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स यांचा समावेश आहे. तर मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव, इशान किशन, रोहित शर्मा, हार्दिक पटेल, जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी हे सामना फिरवण्याची ताकद ठेवतात.

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत 34 सामने झाले आहेत. त्यापैकी 19 सामन्यात मुंबई इंडियन्सने, तर 15 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला आहे. या दोघांमध्ये 35 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होत आहे. या मैदानातील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. मागच्या 80 षटकाचा विचार केला तर या मैदानात 909 धावा झाल्या आहेत. त्यामुळे या सामन्यातही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या मैदानात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नोर्त्झे, खलिल अहमद, मुकेश कुमार.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.