AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI Hardik Pandya Video : इथे काय मजा सुरूये का ? दीपक चहर-रॉबिन मिंझची गचाळ फिल्डींग, हार्दिक पांड्याने तोंडच लपवलं…

Deepak Chahar Robin Minz Catch Video : आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची फिल्डिंग अत्यंत निराशाजनक ठरली आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात दीपक चहर आणि रॉबिन मिंझने सोडलेला सोपा झेल, संघाच्या नवव्या पराभवाला कारणीभूत ठरला. या गचाळ कामगिरीमुळे हार्दिक पांड्या इतका निराश झाला की, त्याला तोंड लपवावे लागले. खराब फिल्डिंगमुळे सामन्याचे निकाल कसे बदलले, यावर हार्दिकने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

MI Hardik Pandya Video : इथे काय मजा सुरूये का ? दीपक चहर-रॉबिन मिंझची गचाळ फिल्डींग, हार्दिक पांड्याने तोंडच लपवलं...
मुंबई इंडियन्सच्या सामन्यात हार्दिंक पंड्यावर तोंड लपवण्याची वेळImage Credit source: social media
| Updated on: May 21, 2026 | 10:40 AM
Share

Catches wins the Matches.. क्रिकेटमध्ये हमखास वापरली जाणारी म्हण.. अफलातून क2च पकडून अनेक खेळाडूनी सामने फिरवलेत, समोरच्या टीमच्या हातातोंडाशी आलेला विजय या कॅचेसनी खेचून घेतलाय. पण आयपीएल 2026 मध्ये अत्यंत सुमार कामगिरी करमाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला मात्र याची काहीच पडलेली दिसत नाही. आयपीएलच्या सीझनमधील 65 वा सामाना होता ईडन गार्डन्सवर. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नायईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईला 4 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या सीझनमध्ये मुंबईचा हा 9वा पराभव असून त्याचं कारण म्हणजे त्यांची अत्यंत गचाळ फिल्डींग.

या सामन्यातही मुंबईने निराशाजनतक कामगिरी केली. आणि त्यातच दीपक चहर- रॉबिन मिंझ यांनी अत्यंत ढिसाळपणा दाखवत एक अतिशय सोपा कॅच सोडल्याने, सर्वांनीच मनातल्या मनात तयांना शिव्या घातल्या. दोन्ही खेळाडूंच्या एकमेकांतील समन्वयाच्या अभावामुळे एक चांगला कॅच ड्रॉप झाला आणि ते पाहून हार्दिक पंड्या इतका निराश झाला की त्याच्यावर अक्षरश: तोंड लपवण्याची वेळ आली. कॅच ड्रॉपचा तो पुचाट क्षण आणि हार्दिकची रिॲक्शन, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

असं काय घडलं ?

कोलकाता टीमच्या डावाच्या 10 व्या षटकात हार्दिक पांड्याने टाकलेल्या चेंडूवर हा प्रकार घडला. वेस्ट इंडिजचा फलंदाज रोव्हमन पॉवेलने दुसऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू उंच हवेत उडून डीप-बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाऊंड्री लाईनच्या दिशेने गेला. मुंबई इंडियन्सचे दोन फिल्डर्स, दीपक चहर आणि रॉबिन मिन्झ, तो कॅच टिपण्यासाठी धावून गेले. दीपक चहर फाइन लेगवरून डावीकडे धावला. दोन्ही खेळाडू चेंडूच्या अगदी जवळ आले, पण आपापसांतील संवादाच्या अभावामुळे ते तिथेच थांबले आणि एकमेकांकडे पाहू लागले. परिणामी, चेंडू नेमका त्यांच्यामध्येच पडला आणि अतिश सोपा झेल हुकला. चहर चेंडूच्या अगदी जवळ आला होता, तरीही त्याने शेवटच्या क्षणी मिन्झकडे पाहिले आणि कॅच ड्रॉप झाला. ही पुचाट कामगिरी पाहून हार्दिक पांड्या इतका निराश झाला की त्यानी आपल्या टी-शर्टमध्येच तोंड लपवलं.

खराब फील्डिंगबद्दल काय म्हणाला हार्दिक ?

सामना संपल्यावर प्रेझेंटेशनदरम्यान हार्दिक पंड्या खराब फिल्डींगबद्दल बोलला. “मला वाटतं, संपूर्ण हंगामात आमची फिल्डींग खूपच खराब झाली. आम्ही अनेक कॅच सोडले, तसं जाणूबुजून कोणीही खेळाडू करत नाही. पण तुम्ही या पार्टपासून पळून जाऊ शकत नाही. म्हणजे, जर तुम्हाला संधी मिळाली आणि सामना जिंकायचा असेल, तर तुम्हाला प्रत्येक संधी, अगदी अर्धवट मिळालेल्या संधीचा सुद्धा फायदा करून घेता आला पाहिजे. जेव्हा तुम्ही असे झेल सोडता जे सामन्याची दिशा बदलू शकले असते, तेव्हा तुम्ही नेहमीच मागे पडता आणि सामन्यात परत येण्याचा प्रयत्न करता” असं हार्दिकने नमूद केलं.

जिंकून निरोप घेण्याची मुंबईची इच्छा

मुंबई इंडियन्ससाठी ही स्पर्धा खूप निराशाजनक ठरल्याने, ते विजयाने या हंगामाचा शेवट करण्याच्या प्रयत्नात असतील. त्यांनी आपल्या 13 सामन्यांपैकी केवळ 4 जिंकले असून 9 गमावले आहेत, ज्यामुळे ते नवव्या स्थानावर आहेत. आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल. तो जिंकायची मुंबईची इच्छा असेल.

Follow Us
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे....
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....