Rohit Sharma : रोहित शर्माला समोर पाहून तिला काय करु नी काय नको असं झालं, पण त्याची चिडचिड झाली VIDEO

Rohit Sharma : हॅमिस्ट्रिंग इंजरीमुळे रोहित शर्मा या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून पाच सामने खेळू शकला नाही. वानखेडे स्टेडियमवर लखनऊन सुपर जायंट्स विरुद्ध त्याने पुनरामगन केलं. त्याने 44 चेंडूत 84 धावा फटकावून दमदार पुनरागमन केलं.

Rohit Sharma : रोहित शर्माला समोर पाहून तिला काय करु नी काय नको असं झालं, पण त्याची चिडचिड झाली VIDEO
Rohit Sharma
| Updated on: May 09, 2026 | 12:03 PM

मुंबई इंडियन्सचा ओपनर रोहित शर्मा हा फक्त भारतातच लोकप्रिय नाहीय, तर जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. रोहित शर्माच्या महिला चाहत्यांची संख्याही कमी नाहीय. अचानक समोर रोहित शर्मा दिसला की, काय करु आणि काय नको असं त्याच्या अनेक फॅन्सना होऊन जातं. आयपीएल 2026 चा सीजन सुरु असताना असाच एक प्रसंग घडला. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. खरंतर या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला रोहित सोबत फोटो काढण्यासाठी खूप उत्साहात पळत आली. पण त्याचवेळी एक ऑकवर्ड करणारा प्रसंग घडला. कदाचित महिलेला सुद्धा वाटलं नसेल असं काही होईल. रोहित सुद्धा सेल्फीसाठी येणाऱ्या चाहत्यांना कधी निराश करत नाही.

व्हिडिओमधील महिलेला अचानक रोहित शर्मा दिसला. त्याला समोर पाहून ती उत्साहात पळत आली. तिला रोहित शर्मासोबत सेल्फी काढायचा होता. तिने तिचा मोबाइल काढला. या दरम्यान तिने तिच्यासोबत असलेल्या मुलांना सुद्धा रोहित सोबत सेल्फी काढण्यासाठी बोलावलं. आप बेस्ट हो असं ती म्हणाली. तिच्यासाठी हा क्षण म्हणजे आयुष्यभराची आठवण होता. पण ही सेल्फी मूमेंट एका विचित्र वळणावर गेली. ही महिला रोहित सोबत फोटो काढत असताना अचानक तिच्या मोबाइलची बॅटरी संपली. मेरा फोन ऑफ हो गया असं ती बोलली.

ती महिला मागून आरडाओरडा करत होती

ती तिथे असलेल्या लोकांकडे त्यांचा मोबाइल मागत होती. जेणेकरुन तिला रोहित सोबत सेल्फी काढता येईल. रोहित काही क्षण थांबला आणि त्याच्या टीम बसकडे निघाला. ती महिला मागून आरडाओरडा करत होती. त्यामुळे रोहित वैतागला. ‘तर मग आता मी काय करु’ असं रोहित वैतागून तिला बोलला. त्या महिला चाहतीने दुसरा फोन आणला व रोहित सोबत फोटो काढला. ‘आप जल्दी करो भाई’ असं रोहित तिला म्हणाला. ती फिमेल फॅन सतत प्लीज आणि सॉरी बोलत होती. अखेरीस तिने रोहित सोबत फोटो काढला.

 

Follow Us