AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक आले… ओतली शाई… त्यांच्याकडे पिस्तूलही… जिवे मारण्याचा होता डाव…आळंदीत नेमकं घडलं काय? विकास लवांडेंचा गंभीर आरोपाने खळबळ

Vikas Lavande Ink Thrown case fir against Sangram Bhandare: विकास लवांडे यांनी शाईफेक प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. हभप संग्राम भंडारे आणि साथीदार अचानक आले. त्यांनी शाई ओतली. त्यांच्याकडे पिस्तूल होते आणि त्यांचा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप लवांडे यांनी भंडारे यांच्यावर केला आहे. 

अचानक आले... ओतली शाई... त्यांच्याकडे पिस्तूलही... जिवे मारण्याचा होता डाव...आळंदीत नेमकं घडलं काय? विकास लवांडेंचा गंभीर आरोपाने खळबळ
मला जीवे मारण्याचा प्रयत्नImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 09, 2026 | 11:47 AM
Share

Vikas Lavande and Sangram Bhandare: वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण यावरून वाद पेटला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने गेल्या एक महिन्यापासून याविषयावर बॅनरबाजी आणि जाहीर वक्तव्य केल्याने काही वारकरी भडकले आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी यापूर्वी जाहीरपणे वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण यावर भाष्य केले. त्यावरून हभप संग्राम भांडारे यांनी सहकाऱ्यांसह त्यांच्यावर शाईहल्ला केला. हवेली तालुक्यातील आळंदी मातोबाची इथं भंडारे यांनी लवांडे यांच्या अंगावर शाई ओतली. त्यानंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठत संग्राम भंडारे यांच्याविरोधात तक्रार दिली.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सत्याग्रह

या सर्व घटनेत विकास लवांडे यांनी बाजू मांडली. त्यांनी ट्वीट केले आहे. “वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही 10/15 गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे. नंतर पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे . पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावाmतोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लवांडे यांना पोलीस संरक्षण द्या

तर या सर्व घटनाक्रमावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी एक्सवर त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! या हल्ल्यामुळं विकास लवांडे यांनी केलेले आरोप हे सिद्धच झाले आहेत आणि असे हल्ले हे काही नवीन नाहीत. यापूर्वीही ज्ञानोबा-तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असंच छळलं होतं, त्यामुळं या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाहीत. या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तत्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे, असे आम्ही समजू. यापुढं लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी.” अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

विकास लवांडे हे एक लढाई जिंकले

हा विकास लवांडे यांचा विजय आहे. काम, क्रोध, मोह, मत्सर या षडरिपूपासून संत संप्रदायाने खूप लांब राहायचे असते. येथे संत संप्रदायात डुप्लिकेट लोक घुसलेले आहेत. यांना ना संतत्व कळले ना वारकरी संप्रदाय कळला.ज्या अर्थी या लोकांनी विकास लवांडे यांच्यासोबत अशी कृती केली, त्यांचा लांबपर्यंत वारकरी संप्रदायाशी संबंध नसल्याचे समोर आले आहे. विकास लवांडे हे एका अर्थाने एक लढाई जिंकलेले आहेत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?