AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Colombia earthquakes : महाभयंकर भूकंपाने जमीन थरथरली; आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक संसार उद्ध्वस्त

कोलंबियामध्ये भूकंपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या भूकंपात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

Colombia earthquakes : महाभयंकर भूकंपाने जमीन थरथरली; आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक संसार उद्ध्वस्त
| Updated on: Aug 11, 2026 | 8:14 AM
Share

कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भूकंपात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर 87 जण जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे 1575 घरांचे नुकसान झाले आहे. तर अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तर 61 इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. भूकंपानंतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

कोलंबियात शक्तीशाली भूकंप झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू आहे. पश्चिम कोलंबियातील काली, क्विब्डो, परेराच्या आसपासच्या भागांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या भूकंपामुळे 1600 इमारतींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्षांच्या म्हणण्यांनुसार, सोमवारी दुपारपर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील बेपत्ता नागरिकांचाही शोध घेण्यात येत आहे. भूकंपानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू चोको या शहरात होता. कोलंबियामधील सर्वात गरीब वस्ती असलेलं शहर आहे. या भागात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या समूहाचं वास्तव्य आहे. या घटनेने लहान मुले आणि तरुणांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. काही भागांत घटनाट जंगलात पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे बचाव पथक जलमार्ग आणि हवाईमार्गाचा वापर करत आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्षांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.  हा भूकंप कोलंबियातील सर्वात शक्तीशाली भूकंप असल्याचे बोलले जात आहे.

कोलंबियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांनी भूकंपानंतर तातडीने मदतीचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर लष्कर आणि बचाव पथकांना जागोजागी मदतीसाठी पाठवण्यात आलं आहे. भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा जीव वाचवणे, जखमींवर उपचार करण्यावर भर दिला जात आहे. सध्या कोलंबियामध्ये मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. या घटनेनंतरही नागरिकांना भूकंपांच्या धक्क्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

Follow Us
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील