AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माच्या फटक्याने जबर दुखापत, मुंबई इंडियन्सच्या सरावादरम्यान घडला प्रकार Video

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित आता जर तर वर अवलंबून आहे. पण मुंबई इंडियन्स उर्वरित सामन्यात कमबॅक करेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबई इंडियन्सने आणि खासकरून रोहित शर्माने चांगली कामगिरी केली. पण रोहित शर्माच्या जोरदार फटक्याने एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

रोहित शर्माच्या फटक्याने जबर दुखापत, मुंबई इंडियन्सच्या सरावादरम्यान घडला प्रकार Video
रोहित शर्माच्या जोरदार फटक्याने पायाला जबर दुखापत, मुंबई इंडियन्सच्या सरावादरम्यान घडला प्रकार VideoImage Credit source: PTI
| Updated on: May 06, 2026 | 4:38 PM
Share

Rohit Sharma IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ नाजूक स्थितीत आहे. खरं तर प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स संघ आऊट झाला आहे. आता उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तरी गणित जर तर वर असणार आहे. या स्पर्धेतील आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यात मुंबई इंडियन्सने चढउतार पाहिले. चढ कमी आणि पराभवाचे उतारच जास्त आले. यात पाच सामन्यात रोहित शर्मा खेळला नाही. पण लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याचं कमबॅक झालं. त्याने या सामन्यात आक्रमकपणे 84 धावांची खेळी केली. तसेच लखनौ सुपर जायंट्सने ठेवलेलं 229 धावांचं लक्ष्य गाठलं. आता रोहित शर्मा पुढच्या सामन्याच्या तयारीला लागला आहे. पुढचा सामना आरसीबीविरुद्ध होणार आहे. या सामन्याची तयारी करताना रोहित शर्माने नेटमध्ये घाम गाळला. पण त्याच्या जोरदार फटकेबाजीने एक ग्राउंड्समॅन जखमी झाली. सराव करताना रोहित शर्माने एक कट शॉट मारला आणि हा चेंडू ग्राउंड्समॅनच्या पायाला लागला.

काय झालं नेमकं मैदानात?

रोहित शर्माने जोरदार फटका मारल्यानंतर ग्राउंड्समॅनच्या पायाला जोरात लागला आणि तो जमिनीवर बसला. वेदना त्याला असह्य होत असल्याचं दिसून आलं. त्याला लागल्याचं पाहून रोहित शर्मालाही वाईट वाटलं. त्याने लगेचच त्याच्याकडे धाव घेतली. इतकंच काय तर सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना जखमी झालेल्या ग्राउंड्समॅनवर उपचार करण्यास सांगितलं. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. रोहित शर्माने ग्राउंड्समॅनची घेतलेली काळजी पाहून त्याच्या चाहत्यांचा ऊर भरून आला आहे. चाहत्यांनी त्याच्या कृतीचं कौतुक करत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

रोहित शर्मा फॉर्मात

मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील स्थिती नाजूक आहे. पण रोहित शर्मा जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसून आलं आहे. रोहित शर्माने पाच सामन्यात 55.25 च्या सरासरीने 221 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 174हून अधिकचा आहे. रोहित शर्माने यात दोन अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने 15 षटकार आणि 9 चौकार मारले आहेत. आता आरसीबीविरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे.

Follow Us
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप