
Mustafizur Rahman Refused To Take Legal Action Against KKR : भारत आणि बांगलादेशमधील संबंध सध्या ताणलेले आहेत. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला नुकतंच आयपीएल 2026 मधून (IPL 2026) रिलीज करण्यात आलं, बाहेर काढण्यात आलं. इंडियन प्रीमिअर लीगच्या मिनी ऑक्शनमध्ये KKR अर्थात कोलकाता नाईट रायडर्स या संघाने मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman)याला 9. 20 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. मात्र बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली हिंसा, त्यादरम्यान हिंदूंवर होणारे अत्याचार या विरोधात भारतात वातावरण तापलं.
IPLमधील फ्रँचायजीने बांगलादेशी खेळाडूला विकत घेतल्याचाही निषेध करण्यात आला, केकेआरच्या मालकांपैकी एक असेला, अभिनेता शाहरुख खान याच्यावरही बरीच टीका झाली. याच वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने केकेआरला निर्देश जारी केला, त्यानंतर केकेआरने मुस्तफिजूरला त्यांच्या संघातून मुक्त केले.
KKR के विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार की नाही ?
आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध संभाव्य कायदेशीर किंवा प्रशासकीय लढाईचा विचार केला जात आहे असे बांगलादेश क्रिकेटर्स वेल्फेअर असोसिएशन (CWAB) चे अध्यक्ष मोहम्मद मिथुन यांनी म्हटले होते. मात्र
मुस्तफिजुर रहमान याच्या सांगण्यावरून कारवाई करण्यात येणार नाहीये.
मुस्तफिजूर रहमानने केकेआरविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला आहे. या 30 वर्षीय वेगवान गोलंदाजाने 2016 साली मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 60 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये रहमानने 8.13 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना 65 विकेट्स टिपल्या.
विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ भारतात न येण्यावरून गोंधळ
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएल 2026 मधून काढून टाकल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीबीने आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 साठी भारतात जाण्यास नकार दिला. बांगलादेशला वर्लडकपमधील त्यांचे सामने भारतातून हलवायची इच्छा होती. मात्र, आयसीसीने बांगलादेश बोर्डाला त्यांच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेशचा संघ ग्रुप सी मध्ये आहे. त्यांच्या व्यतिरिक्त, या गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ आणि इटली यांचाही समावेश आहे. बांगलादेशचा संघ कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर तीन आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरएक सामना खेळेल. पण आता नकार दिल्यावर आता बांगलादेशचा संघ टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतात येतो की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.