आदल्या दिवशी पाच षटकार ठोकले, दुसऱ्या दिवशी आयपीएल लिलावात पाच कोटींची बोली

जयपूर : आगामी आयपीएल मोसमासाठी जयपूरमध्ये लिलाव पार पडला. या लिलावात लोकप्रिय खेळाडूंना नव्या खेळाडूंनी मागे टाकले आहे. क्रिकेटविश्वात अज्ञात असणारा वरुण चक्रवर्ती या तामिळनाडूच्या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाबने 8.40 कोटींची बोली लावत खरेदी केलं. राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटलाही 8.40 कोटींमध्ये खरेदी केलं. तर शिवम दूबे याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पाच कोटींची बोली लावत खरेदी केलं. […]

आदल्या दिवशी पाच षटकार ठोकले, दुसऱ्या दिवशी आयपीएल लिलावात पाच कोटींची बोली
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

जयपूर : आगामी आयपीएल मोसमासाठी जयपूरमध्ये लिलाव पार पडला. या लिलावात लोकप्रिय खेळाडूंना नव्या खेळाडूंनी मागे टाकले आहे. क्रिकेटविश्वात अज्ञात असणारा वरुण चक्रवर्ती या तामिळनाडूच्या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाबने 8.40 कोटींची बोली लावत खरेदी केलं. राजस्थान रॉयल्सने जयदेव उनाडकटलाही 8.40 कोटींमध्ये खरेदी केलं. तर शिवम दूबे याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पाच कोटींची बोली लावत खरेदी केलं. जिथे युवराज सिंह सारख्या अनुभवी खेळाडूवर लिलावाच्या पहिल्या टप्प्यात कुणीही बोली लावली नाही, अखेर मुंबई इंडियन्सने त्याला बेस प्राईस एक कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. तिथे या नव्या खेळाडूंनी बाजी मारली.

शिवम दूबे हा 25 वर्षीय खेळाडू मूळचा मुंबईचा आहे. त्याने या लिलावाच्या आदल्या दिवशीच रणजी सामन्यात एका ओव्हरमध्ये पाच षटकार मारत सागळ्यांना आश्चर्यचकीत करुन सोडलं. याचाच फायदा त्याला आजच्या लिलावात झाला, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याच्यावर तब्बल पाच कोटींची बोली लावत त्याला खरेदी केलं आहे.

शिवमने रणजी ट्रॉफीमध्ये वानखेडे स्टेडियमवर बडोदाविरुद्ध स्पिनर स्वप्निल सिंहच्या पाच चेंडूंवर पाच षटकार मारले. त्याने 60 चेंडूंवर 76 धावा काढल्या होत्या, यात सात षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. शिवम हा डावखा फलंदाज आहे, त्यासोबतच तो एक उत्कृष्ट गोलंदाजही आहे. शिवम आतापर्यांत 11 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे, यात त्याने दोन शतकांसह 567 धाव्या काढल्या आहेत. तसेच त्याने 22 च्या सरासरीने 22 विकेटही घेतल्या आहेत.

शिवमने मुंबई प्रीमियर लीगमध्ये अनुभवी स्पिनर प्रवीण तांबेच्या चेंडूंवर सलग पाच षटकार लावले होते. शिवम रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्याआधी अंडर-19, अंडर-23 संघाच प्रतिनिधीत्व केलं आहे.