IPL 2024 Orange Cap : विराटकडेच ऑरेंज कॅप, या चौघांमध्ये रस्सीखेच

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : विराट कोहली याने ऑरेंज कॅपवरील आपला दबदबा आणखी मजबूत केला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटच्या आसपासही कुणी नाही.

IPL 2024 Orange Cap : विराटकडेच ऑरेंज कॅप, या चौघांमध्ये रस्सीखेच
virat kohli orange cap,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 1:17 AM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अखेर पराभवाची मालिका अखेर खंडीत केली आहे. सलग 6 पराभवानंनतर आरसीबी विजयी झाली आहे. आरसीबीने सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला आहे. आरसीबीचा हा नवव्या सामन्यातील दुसरा विजय ठरला. आरसीबीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि रजत पाटीदार या दोघांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादची आक्रमक फलंदाजी आरसीबीसमोर निष्प्रभ ठरली. हैदराबादचे ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि एडन मार्क्रम हे फलंदाज अपयशी ठरले. हैदराबादचे टॉपसह मिडल ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. हैदराबाद विरुद्ध आरसीबी या सामन्यानंतर ऑरेंज कॅप कुणाकडे आहे? तसेच त्या ऑरेंज कॅपसाठी शर्यतीत कोण आहे? हे जाणून घेऊयात.

विराट कोहली याच्याकडे हैदराबाद विरुद्ध बंगळुरु सामन्याआधी ऑरेंज कॅप होती. विराटने हैदराबाद विरुद्ध अर्धशतक ठोकत अव्वल स्थान आणखी भक्कम केलं. विराटने 43 बॉलमध्ये 4 चौकार आणि 1 सिक्ससह 51 धावांची खेळी केली. विराटने यासह या 17 व्या मोसमात 400 धावांचा टप्पा पार केला. विराट ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये असलेल्यांपैकी एकमेव असा आहे ज्याच्या नावावर 400 पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादचा आक्रमक आणि तोडू बॅट्समन ट्रेव्हिस हेडला या सामन्यात मोठी खेळी करुन आपलं स्थान सुधारुन टॉप 3 मध्ये येण्याची संधी होती. मात्र हेड अपयशी ठरला. हेड अवघी 1 धाव करुन माघारी परतला. मात्र यानंतरही हेड आहे त्याच पाचव्या स्थानी कायम आहे. या 41 व्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपमधील टॉप 5 फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र विराट आणि हेडच्या धावात बदल झाला आहे.

टॉप 5 फलंदाज

विराट कोहली याने 9 सामन्यात 430 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नावावर 8 मॅचमध्ये 349 रन्स आहेत. तिसऱ्या स्थानी दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार ऋषभ पंत विराजमान आहे. पंतने 9 सामन्यात 342 धावा केल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर 9 सामन्यात 334 धावांसह साई सुदर्शन आहे. तर ट्रेव्हिस हेड 7 सामन्यांमध्ये 325 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, विल जॅक्स, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.