Ishan Kishan: वैभवची चर्चा असताना मार्केट इशाननं गाजवलं, कॅप्टन म्हणून केला पराक्रम

Ishan Kishan Double Century: इशान किशनने काल शतकी खेळी खेळली पण आज त्याने जे केले त्यांने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Updated on: Sep 07, 2026 | 2:37 PM
1 / 5
ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावले आहे. त्याने सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात त्याने आपल्या २०० धावा पूर्ण केल्या.

ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावले आहे. त्याने सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात त्याने आपल्या २०० धावा पूर्ण केल्या.

2 / 5

२८ वर्षीय इशानने २७० चेंडूंमध्ये आपल्या २०० धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत त्याने २६ चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. देवदत्त पडिक्कलच्या गोलंदाजीवर चौकार मारून त्याने आपले द्विशतक पूर्ण केले.

3 / 5

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील इशानचे हे दुसरे द्विशतक आहे. २०१६-१७ च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने दिल्लीविरुद्ध २७३ धावा केल्या होत्या. ईस्ट झोनकडून कर्णधार इशान किशन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

4 / 5

संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली आणि खेळपट्टी गोलंदाजांना फारशी मदत करत नव्हती. याचा पुरेपूर फायदा घेत इशानने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील १० वे शतक १२२ चेंडूंमध्ये पूर्ण केले.

5 / 5

झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा बिहारचा खेळाडू इशान किशन, दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा दुसरा कर्णधार आहे. १९८७ मध्ये अंशुमन गायकवाडने अंतिम सामन्यात २१६ धावा केल्या होत्या. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा तो एकूण सहावा फलंदाज ठरला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us