IND vs NZ 3rd T20 मॅचपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, मॅचविनर संघाबाहेर, BCCI कडून मोठी अपडेट

IND vs NZ 3rd t20 Match: भारत न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी-२० सामना उद्या रंगणार आहे. या सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

IND vs NZ 3rd T20 मॅचपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, मॅचविनर संघाबाहेर, BCCI कडून मोठी अपडेट
| Updated on: Oct 26, 2026 | 11:25 AM

IND vs NZ 3rd T20: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे दुसरा टी-२० सामना चुकवल्यानंतर, इशान किशन आता तिसरा टी-२० सामनाही खेळणार नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात इशानला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो दुसऱ्या सामन्यातही खेळू शकला नाही. बीसीसीआयने इशान किशनला तिसऱ्या टी-२० सामन्यातून वगळल्याची घोषणा केली आहे.

इशानच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने काय सांगितले?

Loading...

बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “इशान किशन त्याच्या उजव्या मांडीच्या किरकोळ दुखापतीतून चांगला बरा होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती. तो अद्याप खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही, त्यामुळे तो २७ ऑक्टोबर २०२६ रोजी वेलिंग्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यातून बाहेर राहील. बीसीसीआयची वैद्यकीय टीम इशानच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. कुमार कुशाग्र तिसऱ्या टी-२० सामन्यासाठीही संघासोबत राहील.”

दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनच्या जागी वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली, पण त्याची कामगिरी प्रभावी ठरली नाही. ८ चेंडूंचा सामना करून तो केवळ ४ धावांवर बाद झाला. इशानच्या अनुपस्थितीत, १५ वर्षीय वैभवला तिसऱ्या टी-२० सामन्यातही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. वैभवला पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही.

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट होती. टीम इंडियाने न्यूझीलंडने ठेवलेले १८१ धावांचे लक्ष्य ६ गडी गमावून आणि एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. भारतासाठी तिलक वर्माने शानदार फलंदाजी करत केवळ २६ चेंडूंमध्ये ५१ धावांची धडाकेबाज खेळी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, नमन धीरने १७ चेंडूंमध्ये ३१ धावा आणि नितीश कुमार रेड्डीने १३ चेंडूंमध्ये नाबाद २६ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us