IND vs ENG: भारतीय संघाने दुसरा टी-20 गमावण्यामागे कोण जबाबदार? इशान किशनने सांगितली भलतीच कारणं

भारत आणि इंग्लंडमध्ये रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने गमावला. आता हा सामना गमावल्यानंतर पत्रकार परिषदेत इशान किशनने सामना गमावण्यामागील कारणे बोलून दाखवली आहेत.

IND vs ENG: भारतीय संघाने दुसरा टी-20 गमावण्यामागे कोण जबाबदार? इशान किशनने सांगितली भलतीच कारणं
ishan kishan
| Updated on: Jul 05, 2026 | 3:34 PM

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 4 गडी राखून पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आता 0-1 ने मागे पडला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अजूनही एकही टी-20 सामना जिंकता आलेला नाही. आता इंग्लंडविरुद्ध उर्वरित तिन्ही सामने जिंकले तर भारतीय संघाला मालिका जिंकण्यात यश मिळेल. या पराभवानंतर, भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज, इशान किशनने भारतीय संघ इतका वाईट रीतीने का हरला याचे स्पष्टीकरण दिले.

दुसऱ्या टी20 सामन्यानंतर, इशान किशनने एका पत्रकार परिषदेला हजेरी लावली. त्याला टीम इंडियाच्या नियोजनाबद्दल विचारण्यात आले. उत्तर देताना तो म्हणाला की, “इंग्लंडकडे खूप चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांना आमच्यापेक्षा परिस्थितीची अधिक चांगली समज आहे. आम्ही देखील आमचा खेळ सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यांचे खेळाडू आमच्याविरुद्ध कोणत्या रणनीती वापरत आहेत हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, कारण त्यांना येथे अधिक अनुभव आहे. एक संघ म्हणून आम्ही मधल्या षटकांमध्ये 20 धावा कशा करू शकतो हे आम्हाला पाहावे लागेल. आम्ही यावर चर्चा करून पुढच्या सामन्यात आणखी चांगला खेळ करू.”

ईशन म्हणाला की, “सामना सुरुवातीपासूनच आमच्या नियंत्रणात होता. पण इंग्लंडला मिळालेल्या दोन फ्री हिट्समुळे त्यांच्या फलंदाजांवरील दबाव कमी झाला आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला. मला वाटते की आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. आमच्या स्वतःच्या योजना होत्या, पण बेथेलने खेळपट्टीवर थांबून मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेतल्याबद्दल त्याचे कौतुक करायलाच हवे.”

किशनने कबूल केले की, “वारंवार होणाऱ्या पराभवांचा मानसिकतेवर मोठा परिणाम होतो, एक संघ म्हणून पराभव समजून घेऊन त्यातून पुढे जाण्याइतके खेळाडू हुशार आहेत. आम्ही जिंकलो नसलो तरी, मला वाटते की आम्ही चांगला क्रिकेट खेळत आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कुठे सुधारणा करायची आहे हे समजून घेणे. आम्ही सर्वजण मिळून सुधारणा करण्यासाठी काम करत आहोत.” भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना 7 जुलै रोजी खेळला जाईल.

Follow Us